शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

बार कौन्सिल निवडणुकीतील मतपत्रिकांच्या फोटोग्राफीची गंभीर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:50 IST

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाने नागपूरमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीची गंभीर दखल घेतली आहे. या मुद्यावर लवकरच बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देबार कौन्सिल घेणार बैठक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमक्ष ठेवला जाईल विषय

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाने नागपूरमध्ये झालेल्या मतपत्रिकांच्या फोटोग्राफीची गंभीर दखल घेतली आहे. या मुद्यावर लवकरच बैठक आयोजित करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच, हा विषय योग्य कारवाईसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. व्यास यांच्यासमक्ष ठेवण्यात येणार आहे. कौन्सिलचे सचिव व निवडणुकीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्थापन निरीक्षण समितीचे सदस्य प्रवीण रणपिसे यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ‘लोकमत’ने त्यांना मतपत्रिकांच्या फोटोग्राफीवर स्पष्टीकरण मागितले होते.कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये बुधवारी राज्यघटनेतील गुप्त मतदानाच्या तरतुदीला धक्का पोहोचविणारी व लोकशाहीला तडा देणारी घटना घडली. निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे मोबाईलने फोटो काढून घेतले. त्यापैकी एक फोटो ‘लोकमत’च्या हातात आला असून त्या फोटोवरून संबंधित वकिलाने कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले हे स्पष्ट दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर असल्यामुळे या प्रकरणात बार कौन्सिलकडून कायदेशीर कारवाई होणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे प्रवीण रणपिसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कौन्सिल या प्रकरणाविषयी गंभीर असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीसाठी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. व्यास यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, येत्या रविवारपर्यंत सार्वजनिक सुट्या आल्यामुळे या प्रकरणात न्या. व्यास यांच्याकडून पुढील आदेश मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच, या मुद्यावर लवकरच कौन्सिलची बैठक घेतली जाईल. निवडणुकीपूर्वी वेळोवेळी सूचना जाहीर करून व आचारसंहितेमध्ये मतदार वकिलांना गैरवर्तन टाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. निवडणूक कर्मचाऱ्यांनाही नियमांची माहिती देण्यात आली होती. त्यानंतरदेखील असा प्रकार झाला हे दुर्दैवी आहे अशी भूमिका रणपिसे यांनी मांडली.

काय घडले बुधवारीबुधवारी बार कौन्सिलच्या २५ जागांसाठी निवडणूक झाली. कौन्सिलने मतदार वकिलांना मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई केली होती. वकिलांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे होते. परंतु, मतदार वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली. नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकांचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले अशी विश्वसनीय माहिती आहे. जिल्हा व सत्र न्यायालयात ५,५०८ पैकी ३,५८१ तर, उच्च न्यायालयात ७८१ पैकी ६४४ मतदारांनी मतदान केले.

टॅग्स :Electionनिवडणूक