शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

बँक, आयुर्विमा  कर्मचाऱ्यांचा संप : कोट्यवधी रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:12 IST

Bank, life insurance workers strike, nagpur news केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात गुरुवारी देशातील विविध संघटनांनी पुकारलेल्या संपात बँक आणि आयुर्विमा (एलआयसी) महामंडळाच्या कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संपात दोन्ही संघटनांचे १६ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले.

ठळक मुद्दे१६ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी  जुनी पेन्शन लागू करा

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात गुरुवारी देशातील विविध संघटनांनी पुकारलेल्या संपातबँक आणि आयुर्विमा (एलआयसी) महामंडळाच्या कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या संपात दोन्ही संघटनांचे १६ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले. संपात वर्ग-१ आणि वर्ग-२ चे अधिकारी सहभागी झाले नाहीत.

सेंट्रल ट्रेड युनियनच्या आवाहनार्थ अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (एआयबीईए), बीईएफआय आणि ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशने संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. बँक संघटनांनी किंग्जवे येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयासमोर आणि आयुर्विमा संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालयासमोर सकाळी सरकाच्या धोरणाविरुद्ध नारे-निदर्शने केली. बँकांच्या संपात जवळपास आठ हजार तर आयुर्विमा महामंडळाच्या संपात सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले.

बँकांचे खासगीकरण व आऊटसोर्सिंग थांबवा, नवीन भरतीवर निर्बंध आणा, मोठ्या कॉर्पोरेट थकबाकीदारांवर कारवाई करा, बँकांमधील ठेवींवर व्याजदरात कपात करू नये, सेवा शुल्कात वाढ तसेच आयुर्विमा महामंडळाचे भागभांडवल शेअरबाजारात विकू नका, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण थांबवा, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून १९९५ ची जुनी पेन्शन योजना व सुधारित वेतन श्रेणी लागू करा, या मागण्या कर्मचाऱ्यांनी यावेळी केल्या.

संपात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये ईएमबीईएचे अध्यक्ष सुरेश बोभाटे, महासचिव जयवंत गुर्वे, चेंदिल अय्यर, अशोक एटकरे, सुनील पाठक, श्रीकृष्ण चेंडके, रवी जोशी, प्रभात कोकस, विजय ठाकूर, नरेंद्र भुसादे, आर.पी. राओ, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, सुनील बेलकोड आणि आयुर्विमा महामंडळ संघटनेतर्फे ऑल इंडिया इन्शुरन्स एम्प्लॉईज असोसिएशनचे उपाध्यक्ष व पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष अनिल ढोकपांडे, नागपूरच्या अध्यक्षा नेहा मोटे, रमेश पाटणे, टी.के. चक्रवर्ती, शिवशंकर निमजे, हरी शर्मा, वाय.आर. राव, नरेश अडचुले, राजेश विश्वकर्मा आणि दोन्ही संघटनांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :StrikeसंपbankबँकEmployeeकर्मचारी