शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
3
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
4
SBI चा ग्राहकांना तगडा झटका, मासिक EMI वाढणार! MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सची वाढ 
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
7
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
8
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
9
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
10
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
11
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
13
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
14
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
15
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
16
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
17
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
18
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
19
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
20
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 

नागपुरात  बँकेच्या महिला कॅशियरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 8:43 PM

सिंडीकेट बँकेच्या महिला कॅशियरने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली.

ठळक मुद्देगांधीसागर तलावात घेतली उडी : कारण गुलदस्त्यात, उलटसुलट चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिंडीकेट बँकेच्यामहिला कॅशियरने गांधीसागर तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. प्रियंका राघोबाजी देवघरे (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. दरम्यान, प्रियंकाच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून, पोलीस चौकशी करीत आहेत.प्रियंका गोळीबार चौकात राहत होती. ती सिंडीकेट बँकेच्या महाल शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत होती. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ती कर्तव्यावर जाते, असे सांगून घरून बाहेर निघाली. नेहमीची परत येण्याची वेळ संपूनही ती घरी परतली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क केला. प्रतिसाद मिळत नसल्याने चिंताग्रस्त कुटुंबीय तिच्या शोधासाठी बाहेर पडले. रात्री १० च्या सुमारास गांघीसागर तलावाजवळ प्रियंकाची दुचाकी दिसल्याने तिचे पालक तिला आजूबाजूला शोधू लागले. दरम्यान, बाजूला नागरिकांचा मोठा घोळका दिसल्याने प्रियंकाचे नातेवाईक तिथे पोहचले असता त्यांना पाण्यातून बाहेर काढलेला प्रियंकाचा मृतदेह दिसला. तिच्या वडिलांनी लगेच बाजूच्यांना ओळख पटवून दिली. त्यानंतर गणेशपेठ पोलिसांना कळविण्यात आले. पीएसआय जाधव यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.दरम्यान, चांगल्या पगाराची बँकेतील नोकरी करणाऱ्या प्रियंकाने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते स्पष्ट झाले नाही. कारण पुढे न आल्यामुळे उलटसुलट चर्चा केली जात आहे. आत्महत्येच्या कारणांची चौकशी केली जात असल्याची माहिती पीएसआय मंगला मोकाशी यांनी दिली आहे.आणखी एकाची आत्महत्याया घटनेच्या दीड तासापूर्वी रमेश नामक एका इसमाचा मृतदेह गांधीसागर तलावाच्या पाण्यात आढळला. प्रतीक विजय वंजारी यांनी दिलेल्या माहितीवरून एएसआय खांडरे यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :bankबँकWomenमहिलाEmployeeकर्मचारीSuicideआत्महत्या