एटीएममुळे बँक खातेदारांना मनस्ताप

By Admin | Updated: November 24, 2014 01:16 IST2014-11-24T01:16:06+5:302014-11-24T01:16:06+5:30

स्थानिक युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये नेहमीच पुरेशी रक्कम ठेवल्या जात नाही. कधी रक्कम असते तर ५०० व १००० रुपयांच्या नोटा उपलब्ध नसतात. त्यामुळे स्थानिक युनियन बँकेच्या

Bank account holders' heartburn due to ATM | एटीएममुळे बँक खातेदारांना मनस्ताप

एटीएममुळे बँक खातेदारांना मनस्ताप

रामटेक : स्थानिक युनियन बँकेच्या एटीएम मशीनमध्ये नेहमीच पुरेशी रक्कम ठेवल्या जात नाही. कधी रक्कम असते तर ५०० व १००० रुपयांच्या नोटा उपलब्ध नसतात. त्यामुळे स्थानिक युनियन बँकेच्या एटीएम कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक व्यवहार गोत्यात आल्याने जिल्ह्यातील सर्व खासगी शाळांतील शिक्षकांचे पगार युनियन बँकेच्या विविध शाखांमधून केले जातात. युनियन बँकेच्या बहुतांश खातेदारांकडे एटीएम कार्ड आहे. बहुतांश कर्मचारी त्यांच्या पगाराची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढत नाही.
ही मंडळी त्यांच्या सोईनुसार बँकेतून रक्कम काढत असते. यासाठी शिक्षक मंडळी एटीएम कार्ड व मशीनचा उपयोग करते. कारण एटीएम मशीनमधून कधीही रक्कम काढता येते. यात खातेदारांच्या वेळेची बचत होऊन त्यांचा त्रास वाचतो.
युनियन बँकेच्या खातेदारांना याच बँकेच्या एटीएममधून महिन्याला आठवेळा आणि इतर बँकेच्या एटीएममधून तीनवेळा पैसे काढता येतील, अशी सूचना बँकेने एसएमएसद्वारे खातेदारांना दिली. याव्यतिरिक्त युनियन बँकेच्या एटीएमचा अधिक वापर केल्यास प्रत्येक व्यवहाराला १५ रुपये व इतर बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास प्रत्येक व्यवहारासाठी ५० रुपये बँक खात्यातून कपात केले जाईल, असेही कळविण्यात आले.
रामटेक शहरात रामटेक-तुमसर मार्गावर युनियन बँकेची एकमेव एटीएम मशीन आहे. या मशीनमध्ये कधीच पुरेशी रक्कम नसते. यात केवळ १०० रुपयांच्या नोटांचा भरणा अधिक असतो. एखाद्या व्यक्तीला ५० हजार रुपये हवे असल्यास त्याला प्रत्येकी तीन हजार रुपयांप्रमाणे किमान १६ वेळा विड्रॉल घ्यावे लागतील. यातून त्याच्या बँक खात्यातून १२० रुपयांची महिन्याकाठी कपात केली जाईल. हा प्रकार वारंवार होत असल्याने खातेदारांनी बँक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर बँक शाखा व्यवस्थापक अधिकारी असंबद्ध उत्तरे देत असल्याचा आरोप खातेदारांनी केला.
या प्रकाराला वेळीच आळा घालावा, तसेच शिक्षकांशी सलोख्याने वागावे, अशी मागणी शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून, आंदोलनाचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bank account holders' heartburn due to ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.