ते वडाचे झाड तोडण्याचा प्रयत्न : हायकोर्टाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:38 IST2018-08-24T00:35:31+5:302018-08-24T00:38:52+5:30
अंबाझरी तलावापुढील घाटे रेस्टॉरंटजवळ असलेले अत्यंत जुने वडाचे झाड तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण वैधता पडताळण्यासाठी सुनावणीकरिता दाखल करून घेतले आहे.

ते वडाचे झाड तोडण्याचा प्रयत्न : हायकोर्टाची दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी तलावापुढील घाटे रेस्टॉरंटजवळ असलेले अत्यंत जुने वडाचे झाड तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हे प्रकरण वैधता पडताळण्यासाठी सुनावणीकरिता दाखल करून घेतले आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांनी गुरुवारी या प्रकरणात मनपाला नोटीस बजावून अॅड. जेमिनी कासट यांना यासंदर्भात आवश्यक माहिती घेण्यास सांगितले. तसेच, सहायक सरकारी वकील कल्याणी देशपांडे यांना हे प्रकरण चालविण्यासाठी न्यायालयास सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. प्रकरणावर शुक्रवारी पुढील सुनावणी होईल. संबंधित वडाचे झाड रोडवर आहे. झाडाच्या पायथ्याशी देव ठेवलेले होते. झाड तोडायचे असल्यामुळे देव हटविण्यात आले असे न्यायालयाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.