शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार करणार दलालांचा बंदोबस्त : महानिरीक्षक चौहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:53 IST

रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्यात महिलांची छेडखानी करणे, आयटी अ‍ॅक्टनुसार कारवाईचे अधिकार देण्याची मागणी शासनाकडे केली असून आयटी अ‍ॅक्टच्या मदतीने आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देछेडखानीच्या घटनांवर अंकुश लावणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्यात महिलांची छेडखानी करणे, आयटी अ‍ॅक्टनुसार कारवाईचे अधिकार देण्याची मागणी शासनाकडे केली असून आयटी अ‍ॅक्टच्या मदतीने आॅनलाईन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आर. एस. चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली.महानिरीक्षक चौहान म्हणाले, पूर्वी चोरीची प्रकरणे लोहमार्ग पोलिसांकडे सोपवावी लागत होती. परंतु जेंव्हापासून या प्रकरणात कारवाईचे अधिकार आरपीएफला मिळाले, तेंव्हापासून अनेक आरोपी पकडण्यात आले. रेल्वे अ‍ॅक्टमध्ये संशोधनासाठी आरपीएफच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. ही कमिटी शासनाच्या संपर्कात आहे. कमिटीतर्फे सुचविण्यात आलेले संशोधन संसदेत मंजूर होऊन लवकरच शासन आरपीएफला अधिकार देण्याची शक्यता आहे. ते म्हणाले, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लेडीज कोचच्या खिडक्यांना पिवळा रंग देण्यात आला आहे. पॅनिक बटन लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागपूर विभागात रेल्वे प्रॉपर्टी अ‍ॅक्टनुसार ३३ प्रकरणांचा निपटारा करून २.७७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा आकडा मागील १६ वर्षांपर्यंत मर्यादित होता. झोनमध्ये तिकिटांच्या काळाबाजाराचे ६० गुन्हे दाखल करून ६७ जणांना अटक करण्यात आली. यातील सर्वाधिक २५ गुन्हे नागपूर विभागातील आहेत. गांजाच्या तस्करीत ७.५० लाखाचा मुद्देमाल जप्त करून २० आरोपींना अटक करण्यता आली आहे. या वर्षी झोनमध्ये चोरीच्या ११४ गुन्ह्यात १८६ जणांना अटक करण्यात आली आहे. यात नागपूर विभागात सर्वाधिक ४९ गुन्ह्यात ८४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात सर्वाधिक प्रकरणे मोबाईल चोरीची असून ८ लाखाचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.विभागाला मिळणार १० ‘बॉडी विअर कॅमेरा’विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डयेय यांनी सांगितले की, २६ जानेवारीपर्यंत आरपीएफच्या नागपूर विभागाला १० बॉडी विअर कॅमेरा मिळणार आहेत. त्याची मंजुरी मिळाली आहे. हे बॉडी विअर कॅमेरा रेल्वेगाड्यात गस्त घालणाऱ्या जवानांना देण्यात येतील. यात आठ तासांचे चित्रीकरण होणार आहे. कॅमेराच्या मदतीने आरपीएफ जवानांसह प्रवाशांच्या हालचालींची नोंद होऊन सत्य उजेडात येणार आहे. ते म्हणाले, दाखल असलेल्या गुन्ह्यात संगणकीकरणात दपूम रेल्वेचा नागपूर विभाग इतर विभागाच्या तुलनेत पुढे आहे. यावेळी सहायक सुरक्षा आयुक्त अमर कुमार स्वामी यांच्यासह आरपीएफचे अधिकारी उपस्थित होते.६ कोटी खर्चुन नव्या पोस्टची निर्मितीमहानिरीक्षक चौहान यांनी सांगितले की, नागपूर-छिंदवाडा मार्गावर प्रवाशांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी मुख्यालयाने सहा कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यात छिंदवाडा, भंडारात नव्या पोस्ट, नैनपूर, बालाघाटसह इतर दोन ठिकाणी आऊट पोस्ट तयार करण्यात येतील. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतवारी, रामटेकसह नागपूर विभागातील १७ रेल्वेस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर