शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंदी, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:42 IST

Nagpur : पाचशे रुपयांचा स्टॅम्पपेपर ठरतोय डोकेदुखी

लोकमत न्यूज नेटवर्ककाटोल : सरकारी आणि खासगी कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावण्याऱ्या स्टॅम्पबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १०० आणि २०० रुपयांच्या स्टॅम्पवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आता किमान ५०० रुपयांच्या स्टॅम्पवरच नोटरी, खरेदी, हक्क किंवा प्रतिज्ञापत्र दिले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसत असल्याचे वास्तव आहे.

राज्य सरकारने महसूलात वाढ व्हावी यासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करण्याची भूमिका घेतली आहे. या ऐवजी ५०० चा स्टॅम्प पेपर वापरण्याची घोषणा केली आहे. २०२४ च्या शेवटी हा निर्णय घेण्यात आला असला तरी याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

तहसील किंवा महसूल कार्यालयात फक्त १०० आणि २०० रुपयांमध्ये वैयक्तिक कारणांसह बँक आणि विविध कामे होत होती. परंतु, आता यासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना बँकेच्या छोट्या-मोठ्या कामाचे करारनामे असो किंवा ठेवीचे करारनामे असो किंवा इतर कामाकरिता ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे शैक्षणिक कामाकरिता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी १०० रुपयांचे तिकीट लावून साध्या कागदावर ज्याप्रमाणे कागदपत्राची कामे पूर्ण केली जात आहे, अशीच सूट कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसह इतर कामाकरिता देण्यात येण्याची मागणी केली जात आहे.

"आजवर अनेकदा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेतले. कर्ज घेताना स्टॅम्प पेपरवर काही लेखी पडताळणी देऊन आम्हाला कर्ज प्राप्त झाले. परंतु, आता या कर्जाकरिता काही करारनामे करण्याकरिता शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेण्याकरिता गेले असता तो कुठेही मिळून आला नाही. आता पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर तोच करारनामा करून देण्याची वेळ आली आहे."- सरला बोरकर, रा. सिंदी शेतकरी.

टॅग्स :nagpurनागपूर