शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

नागपूर रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 17:34 IST

८ नोव्हेंबरपर्यंत निर्बंध : नागपूरसह सात स्थानकांना निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने प्रवाशांची जागोजागच्या रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होणार आहे. त्यात प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची आणखी भर पडू नये म्हणून मध्य रेल्वेने नागपूर, पुणे, मुंबईसह सात मोठ्या रेल्वेस्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दि. ८ नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाणार नाहीत.

दिवाळी आणि छटपूजेच्या निमित्ताने मोठ्या रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीची संधी साधून समाजकंटक, चोर-भामटे सक्रिय होतात. त्यामुळे प्रवाशांना मोठे नुकसान होते. एकीकडे प्रवाशांच्या गर्दीमुळे रेल्वेस्थानक परिसरात पाय ठेवायला, जागा नसताना आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी किंवा त्यांना रेल्वेस्थानकावर घ्यायला येण्यासाठी अनेकजण येतात. परिणामी गर्दीत आणखीच भर पडते. तसे होऊ नये म्हणून गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध उपाययोजना करण्याचे ठरले आहे.

त्यात फलाटावर सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्यांना रोखण्याचाही एक उपाय आहे. त्यानुसार, राज्यातील निवडकप्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दि. ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. सणासुदीच्या काळात सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे. 

खालील स्थानकांवर मिळणार नाही प्लॅटफॉर्म तिकीटमुख्य रेल्वेस्थानक नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर रेल्वेस्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे रेल्वेस्थानक, कल्याण रेल्वेस्थानक आणि पुणे रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट मिळणार नाही. 

वृद्धांना, रुग्णांना सूट गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ही व्यवस्था केली आहे. मात्र, त्यातून ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना सूट देण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्यांना हे निर्बंध लागू होणार नसल्याचे रेल्वेने कळविले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर