शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

फुग्याच्या सिलींडरचा स्फोट, चार वर्षांचा चिमुकला ठार, दोन महिला जखमी

By दयानंद पाईकराव | Updated: December 24, 2023 23:31 IST

सदरच्या बिशप कॉटन स्कूल मैदानासमोरील घटना

नागपूर : ख्रिसमसच्या पूर्व संध्येला नातेवाईकांसह खरेदीसाठी आलेला एक चार वर्षांचा चिमुकला फुग्याच्या सिलींडरचा स्फोट झाल्यामुळे ठार झाला. तर या स्फोटात दोन महिला जखमी झाल्या. ही घटना सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बिशप कॉटन स्कूल समोरील मैदानात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिझान आसिफ शेख (वय ४, रा. मानकापूर) असे या सिलींडर स्फोटात ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर फरिया हबीब शेख (वय २८) आणि अनमता हबीब शेख (वय २४) असे जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. जखमी झालेल्या फारिया व अनमता या सिझानच्या मावशी आहेत. त्या खरेदीसाठी बिशप कॉटन स्कूल समोरील मेदानासमोर गेल्या होत्या. तेथे रात्री ८.३० वाजता एक फुगेवाला गॅसने भरलेले फुगे विकत होता.

फुगेवाल्याच्या बाजुला तीघेही उभे असताना अचानक सिलींडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाले. त्यानंतर ते सिलींडर सिझानच्या डोक्यावर आदळले. यात सिझान गंभीर जखमी झाला. तर फरिया व अनमता यांनाही सिलींडर लागल्यामुळे त्या जखमी झाल्या. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील सिझान, फरिया व अनमता यांना कुटुंबीयांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. यातील सिझानला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी फरिया आणि अनमता यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेनंतर सदर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.फुगे विक्रेता झाला फरार

सिलींडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाल्यानंतर सिझानच्या डोक्यावर पडले आणि दोन महिला जखमी झाल्याचे पाहून फुगे विक्रेत्याने आपली मोपेड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. सदर पोलिसांनी फुगे विक्रेत्याच्या मोपेडचा क्रमांक मिळवून त्याचा शोध सुरु केला आहे. घटनास्थळी फुटपाथवर नेहमीच विक्रेत्यांची रेलचेल राहत असल्यामुळे नागरिकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी राहत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

टॅग्स :fireआगnagpurनागपूरDeathमृत्यू