शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
3
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
4
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
5
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
7
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
8
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
9
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
10
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
11
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
12
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
13
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
14
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
15
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
16
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
17
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
18
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
19
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
20
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:16 AM

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन

नागपूर : एक संघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना यापुढे विदर्भाकडे दुर्लक्ष होणार नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पाऊल हे विकासाचे असेल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे आदिवासींच्या संस्कृतीचे केंद्र ठरेल आणि या संस्कृतीचे दर्शन जागतिक पर्यटकांना करून दिले जाणार असल्याचे सांगितले. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील इंडियन सफारीचे उद्घाटन आणि स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यान असे नामकरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड होते. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे आमदार आशीष जयस्वाल, आमदार अभिजित वंजारी, आमदार नरेंद्र भोंडेकर,  आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष  रश्मी बर्वे,  माजी आमदार प्रकाश गजभिये,  वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद मैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव विकास खारगे, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू, वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एन. वासुदेवन  प्रमुख्याने उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी २.४५ वाजता विमानाने आगमन झाले. आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर  इंडियन सफारीचा अनुभव घेतला.समारंभात उद्धव ठाकरे म्हणाले,आमचे आजोळ विदर्भातील म्हणजे परतवाड्यातील आहे. त्यामुळे आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. विदर्भ बाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये किंवा अपप्रचार देखील करू नये. या क्षणापासून विदर्भाच्या विकासाकडे कसलेही दुर्लक्ष होणार नाही.नागपुरातील या प्राणी संग्रहालया एवढा देशात एकही झू नसावा. नागपुरात सिंगापूरच्या धर्तीवर नाईट सफारी सुरू केली जाणार आहे. गडचिरोलीतील सुरजागडचा प्रकल्प देखील लवकरच मार्गी लावायचा आहे.या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. मात्र गोसेखुर्दच्या पाण्यानेच तो धुवून काढायचा आहे.नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण १ मे रोजी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.नामकरणाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या विरोधाचा उल्लेख करून ते म्हणाले, या नामकरणाच्या प्रसंगी कुणीही नाराज होण्याची किंवा अस्वस्थ होण्याचे कारण नाही.  या प्रकल्पाच्या कामातील पुढील टप्प्यात गोंडवाना थीम पार्क उभारले जाईल.

वसईमध्ये तेथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन जसे घडते, तसे दर्शन या प्रकल्पातून जागतिक पर्यटकांना घडविले जाईल.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकारातून मुंबईत उद्घाटन झालेल्या सायबर पोलिस स्टेशनचा आणि तुरूंग पर्यटनाचा देखील त्यांनी उल्लेख केला. देशातील हे पहिले पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री संजय राठोड म्हणाले, मागील दहा वर्षापासून या उद्यानाची फक्त चर्चाच होती. प्रत्यक्षात ते साकारले गेले नाही. महाविकास आघाडी सरकारने एक वर्षात येथील  इंडियन सफारीचे उद्घाटन करून दाखविले. विदर्भातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा हा टप्पा असला तरी विरोधक आदिवासी समाज बांधवांना पुढे करून याबाबत नाहक गैरसमज पसरवित आहे. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, विदर्भ ही वाघांची राजधानी आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात व्याघ्र प्रकल्पाची आखणी केली. त्यानंतर योजनापूर्वक देशात वाघांची संख्या वाढली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विदर्भप्रेम देखील त्यांनी  विदीत केले.पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले, वन आणि नागरी विकासामध्ये एफडीसीएमची भूमिका मोठी आहे.       एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक  एन. वासुदेवन यांनी प्रास्ताविकातून एफडीसीएमची भूमिका आणि विकासाची दिशा मांडली, तर आभार एफडीसीएमचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन यांनी मानले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे