बालाजी पाटील हायस्कूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:23+5:302020-11-28T04:11:23+5:30
जिजामाता हायस्कूल, खापा खापा : जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब ...

बालाजी पाटील हायस्कूल
जिजामाता हायस्कूल, खापा
खापा : जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. मुख्याध्यापक सुरेंद्र गभने, वर्षा सेलोकर, भीमराव बनसिंगे, आनंद मेनकुदळे व सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
सावनेर पंचायत समिती
सावनेर : सावनेर पंचायत समितीच्या सभागृहात संविधान दिवस साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी अनिल नागने होते. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला सहायक गट विकास अधिकारी दीपक गरुड, पशुधन विकास अधिकारी डॉ.रोहिणी टेंभूर्णे, कृषी अधिकारी चंद्रशेखर वानखेडे, कक्ष अधिकारी योगेश संगेवार, अधीक्षक महेश राऊत, आरोग्य अधिकारी मधुकर सोनोने, विस्तार आधिकारी गीतांजली नांदुरकर, सहायक लेखा अधिकारी (कृषी) सुजाता बारोकर, कनिष्ठ अभियंता संकेत जयसिंगकर, ग्रामसेवक मोरेश्वर खारकर तथा अन्य कर्मचारी उपस्थित होते. संचालन स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक प्रदीप बागडे यानी केले. सहायक गटविकास अधिकारी दीपक गरुड यांनी आभार मानले.