बेकरीत तोडफोड करून गल्ला लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:08 IST2021-01-17T04:08:07+5:302021-01-17T04:08:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोमिनपुऱ्यातील बेकरीत तोडफोड करून गल्ला लुटणारा कुख्यात गुंड शानू भांजा ऊर्फ अरबाज इसराईल अंसारी ...

The bakery was vandalized and looted | बेकरीत तोडफोड करून गल्ला लुटला

बेकरीत तोडफोड करून गल्ला लुटला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मोमिनपुऱ्यातील बेकरीत तोडफोड करून गल्ला लुटणारा कुख्यात गुंड शानू भांजा ऊर्फ अरबाज इसराईल अंसारी (वय २७, रा. मोमिनपुरा) याच्या तहसील पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी १० हजार रुपये जप्त करण्यात आले. आरोपी शानू भांजा हा कुख्यात गुंड आहे. तो १२ जानेवारीच्या सायंकाळी ६.१५ वाजता अनिस अहमद अब्दुल अजिज यांच्या अल अजिज बेकरीत शिरला. अनिस यांना मेरे नंबरकारी को क्यूं मारा, अशी विचारणा करत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. बेकरीतील साहित्याची फेकाफेक करून तोडफोड केली आणि गल्ल्यातील १८ हजार रुपये लुटून पळून गेला. अनिस यांच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यानंतर आरोपी दोन दिवस फरार राहिला. त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांना १४ जानेवारीच्या रात्री तो घरी आल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून लुटलेल्या १८ पैकी १० हजार जप्त केले. त्याला लुटमारीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक जयेश भंडारकर, द्वितीय निरीक्षक बलीरामसिंग परदेसी, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, हवालदार समीर शेख, नायक नाझिर शेख, हेमंत पराते, प्रवीण लांडगे आदींनी ही कारवाई केली.

Web Title: The bakery was vandalized and looted