बजाज यांना शिक्षण विभागाचाही होता पाठिंबा

By Admin | Updated: November 24, 2015 06:12 IST2015-11-24T06:12:59+5:302015-11-24T06:12:59+5:30

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूल,जरीपटक्याचे दीपक बजाज यांना शिक्षण

Bajaj was also supported by the Department of Education | बजाज यांना शिक्षण विभागाचाही होता पाठिंबा

बजाज यांना शिक्षण विभागाचाही होता पाठिंबा

नागपूर : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडकलेल्या महात्मा गांधी सेंटेनियल हायस्कूल,जरीपटक्याचे दीपक बजाज यांना शिक्षण विभागाचेही पाठबळ असल्याचे उघडकीस आले आहे.
दीपक बजाज यांच्या शाळेत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आलेल्या धान्याची अफरातफर होत असताना, शालेय पोषण आहार अधिकारी नीलेश वाघमारे यांनी धाड टाक ली होती. परंतु शिक्षण विभागाने अशी कुठलीही धाड टाकली नसल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट केले आहे. या धाडीत जरीपटका पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी माहिती अधिकारात दिलेल्या माहितीत धाड टाकल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. बजाज यांच्या शाळेवर टाकलेल्या धाडीची साधी माहिती शिक्षण विभाग लपवून ठेवत असल्याने, शिक्षण विभागाचा संपूर्ण पाठिंबा बजाज यांना होता, हे लक्षात येते. १६ आॅगस्ट २०१५ रोजी महात्मा गांधी हायस्कूल,जरीपटका येथे शालेय पोषण आहार योजनेत येणारा तांदूळ बाहेर विकण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाला मिळाली होती. त्यानुसार सकाळी ११ वाजता शालेय पोषण आहार योजनेचे अधिकारी नीलेश वाघमारे यांनी जरीपटका पोलिसांच्या मदतीने शाळेत धाड टाकली.
यावेळी शाळेच्या आवारात एक ट्रक, वजनकाटा व तांदूळ भरलेली पोती आढळून आली. परंतु शिक्षण विभागाने कुठलीही कारवाई केली नाही. यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षण कर्मचारी संघातर्फे शिक्षण विभागाला या धाडीसंदर्भात संपूर्ण अहवाल तसेच केलेल्या कारवाईचा तपशील माहितीच्या अधिकारात मागितला. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी दिलेल्या माहितीत सदर शाळेत कोणत्याही प्रकारची धाड टाकण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले. हीच माहिती संघटनेने सहायक पोलीस आयुक्त पाचपावली यांना मागितली. पोलिसांनी दिलेल्या माहितीत महात्मा गांधी शाळेत अन्नधान्याची अफरातफर होत असल्यामुळे शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शिक्षण विभागातर्फे धाड टाकण्यात आली होती. जरीपटका पोलिसांचे या धाडीसाठी सहकार्य घेण्यात आले होते.
ही धाड टाकण्यासाठी शिक्षण विभागातर्फे शालेय पोषण आहार योजनेचे अधिकारी नीलेश वाघमारे हे पोलीस स्टेशनला आले होते. त्यांच्या सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वाकडे हे घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीत असा स्पष्ट उल्लेख असतानाही, शिक्षण विभागाने ही कारवाई नाकारली होती.
बजाज यांना वाचविण्यासाठी शालेय पोषण आहार अधिकारी व बजाज यांच्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याचा आरोप प्रजासत्ताक संघटनेचे हेमंत गांजरे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Bajaj was also supported by the Department of Education