महापौर संदीप जोशी यांच्यासह २० जणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 23:44 IST2020-01-31T23:43:13+5:302020-01-31T23:44:49+5:30
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने २००५ मधील फौजदारी प्रकरणात महापौर संदीप जोशी यांच्यासह २० आरोपींविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट बजावले.

महापौर संदीप जोशी यांच्यासह २० जणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने २००५ मधील फौजदारी प्रकरणात महापौरसंदीप जोशी यांच्यासह २० आरोपींविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट बजावले.
२००५ मध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा व काँग्रेस नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर हातापाई झाली होती. त्यासंदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. ते प्रकरण या न्यायालयात प्रलंबित आहे. भाजपा नेते संदीप जोशी, प्रवीण दटके व अन्य आरोपी पुरेशी संधी देऊनही प्रकरणावरील सुनावणीला हजर राहिले नाही. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.