शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

नशेत दोघांना उडविणाऱ्या महिलेस जामीन नाकारला;  नागपुरात मर्सिडिजने घेतले होते दोन बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 09:15 IST

ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती.

नागपूर : पुण्यातील पार्शे कारसारखा भीषण अपघात करणारी नागपूरची ३९ वर्षीय धनाढ्य महिला रितिका उर्फ रितू दिनेश मालू हिचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी हा निर्णय दिला.

ही हृदयद्रावक घटना २५ फेब्रुवारी २०२४ रोजी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास मुख्य रेल्वेस्थानकाजवळच्या रामझुल्यावर घडली होती. रितिका मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगात मर्सिडिज कार चालवित होती. तिने रामझुल्यावर मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा (३४, रा. नालसाहब चौक) व मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (३४, रा. जाफरनगर) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे हे दोन्ही तरुण दूरवर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाले. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी दोन्ही तरुणांना जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरनी मोहम्मद हुसैनला तपासून मृत घोषित केले, तर मोहम्मद आतिफचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  दोनही तरुण बँक फायनान्सचे काम करीत होते.

गृहमंत्र्यांनी जबाबदारी पाळली : शरद पवारमुंबई : पुणे अपघात प्रकरणात राज्याच्या गृहमंत्र्यांनी जबाबदारी पाळलेली आहे, ती दिसल्यानंतर उगीच याला वेगळे स्वरूप देण्याची आवश्यकता नाही, असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पुणे अपघातातील आरोपींच्या वकिलाबरोबर शरद पवारांचा फोटो विरोधकांनी समोर आणला आहे. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, आपला फोटो कुणाबरोबर असला म्हणजे त्याच्याशी संबंध कसा जोडता? असा सवाल शरद पवारांनी उद्विग्न होत विचारला. 

टॅग्स :Courtन्यायालयDrunk And Driveड्रंक अँड ड्राइव्हnagpurनागपूर