शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

कुख्यात आंबेकरचा जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: May 16, 2014 00:50 IST

अंबाझरी पोलीस ठाण्यात पिस्तुलाच्या धाकावर बिल्डरकडून धनादेशाच्या स्वरूपात ६५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी कुख्यात खंडणीबहाद्दर संतोष शशिकांत आंबेकर

पिस्तुलाच्या धाकावर खंडणी वसुलीप्रकरण

नागपूर : अंबाझरी पोलीस ठाण्यात पिस्तुलाच्या धाकावर बिल्डरकडून धनादेशाच्या स्वरूपात ६५ लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी कुख्यात खंडणीबहाद्दर संतोष शशिकांत आंबेकर याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी. जगमलानी यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.

खामला भागातील आदिवासी सोसायटी शास्त्री ले-आऊट येथील रहिवासी बिल्डर जितेंद्र अयोध्याप्रसाद चव्हाण यांनी रविकांत खुशाल बोपचे यांच्याशी भागीदारी करून, २२ फेब्रुवारी २0१३ रोजी राहुल बाबूराव वासनिक याचा अंबाझरी ले-आऊटमधील ३ हजार चौरस फुटाचा भूखंड ६५ लाखांत विकत घेतला होता. या सौद्याच्या सहा महिन्यानंतर राहुल वासनिक याची पत्नी पूनम ही संजय फातोडे आणि गौतम भटकर यांना सोबत घेऊन चव्हाण यांच्या कार्यालयात गेली होती. तिने भूखंडाच्या विक्रीचे पैसे मागितले असता, चव्हाण यांनी तिला तिच्या पतीकडूनच कायदेशीर मार्गाने पैसे घेण्याचा सल्ला दिला होता. बिल्डरकडून आपणास रक्कम मिळत नसल्याचे पाहून, पूनमने आपल्या साथीदारांच्या ओळखीने कुख्यात संतोष आंबेकरची मदत घेतली होती.

पुढे संतोषने चव्हाण यांना आपल्या इतवारी येथील कार्यालयात बोलावले होते. पूनमच्या मिळकतीचे ६५ लाख रुपये देऊन टाक, त्यानंतरच माझ्याकडून राहुल वासनिक याच्या घराच्या तळमजल्याची चावी घेऊन जाशील, नाही तर प्रॉपर्टी विसरून जा, अशी धमकीही संतोषने दिली होती.

१४ डिसेंबर २0१३ रोजी राहुल वासनिक याने चव्हाण यांना तळमजल्याचा ताबा देऊन टाकला होता. त्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी चव्हाण यांना बोलावून याबाबतचा जाब विचारला होता. त्याच दिवशी आंबेकर हा आपले साथीदार युवराज माथनकर आणि आकाश बोरकर यांना सोबत घेऊन अंबाझरी पोलीस ठाण्यात गेला होता.

या ठिकाणी आंबेकरने आपल्या कंबरेत खोचलेले पिस्तूल चव्हाण यांना दाखवून त्यांच्याकडून ६५ लाखांचे दोन धनादेश लिहून घेतले होते. त्यापैकी ३0 लाखांचा एक धनादेश पूनमच्या नावाचा होता, दुसरा ३५ लाखांचा धनादेश विना नावाचा होता.

चव्हाण यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी १७ जानेवारी रोजी संतोष आंबेकर, संजय फातोडे, युवराज माथनकर, पूनम वासनिक, आकाश बोरकर, गौतम भटकर यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३४२, ३८६, ३८७, ३४ तसेच हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, चव्हाण यांनी या दोन्ही चेकबाबत बँकेला कळवून ‘स्टॉप पेमेंट’ करण्यास सांगितले होते. त्यामुळे चिडून ८ जानेवारी २0१४ रोजी चार जणांनी चव्हाण यांच्या घरावर हल्ला केला होता. आल्टो आणि घराच्या खिडक्यांची तोडफोड केली होती. याबाबत राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.

२९ जानेवारी २0१४ रोजी गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयाच्या आवारात संतोष आंबेकर आणि त्याच्या चार साथीदारांना अटक केली होती. (प्रतिनिधी)