अॅट्रोसिटीच्या समर्थनार्थ बहुजनाचा एल्गार
By Admin | Updated: January 14, 2017 17:15 IST2017-01-14T17:15:33+5:302017-01-14T17:15:33+5:30
अॅट्रोसिटी अॅक्टच्या समर्थनार्थ शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला.

अॅट्रोसिटीच्या समर्थनार्थ बहुजनाचा एल्गार
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - अॅट्रोसिटी अॅक्टच्या समर्थनार्थ शनिवारी नागपुरात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बौद्ध, दलित, आदिवासी, मुस्लीम, ओबीसी आदी समजाचे लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रेशीमबाग चौक येथून निघालेला हा मोर्चा अशोक चौक, बैद्यनाथ चौक, सीताबर्डी, व्हेरायटी चौक मार्गे संविधान चौक येथे पोहोचला. संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरंच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चा सुरू होण्यापूर्वी रेशिमबाग मैदान येथे जाहीर सभा पार पडली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे अध्यक्षत्स्थानी होते. या सभेला भारत मुक्ती मोर्चा व बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन करीत राज्य सरकारवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, अॅट्रोसिटी अॅक्ट शिथील करण्याचे षडयंत्र सरकार रचत आहे. परंतु या कायद्यातील एक ऊकार किंवा स्वल्पविराम सुद्धा कमी केला तर सोडणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मराठा व ओबीसी बांधवांमध्ये सरकार भांडण लावत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
यावेळी भदंत सुरेई ससाई, रवी शेंडे, नारायण बागडे, अर्चना भोयर, श्रीधर साळवे, सुनील पेंदारे, प्रा. रमेश पिसे, मंगेश गेडाम, रेव्हरंट गायकवाड, इमाम मसुद, मौलाना हफीज असरफ आदींनीही मार्गदर्शन केले.
मोर्चाच्या प्रमुख मागण्या
अॅट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा, यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था करावी
भटके विमुक्त जातीलाही अॅट्रोसिटी अंतर्गत संरक्षण देण्यात यावे
सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करून लोकसंख्येनुसार आरक्षण देण्यात यावे.
ओबीसींची जाती आधारित जनगणना करण्यात यावी त्यांना लोकसंख्येप्रमाणे आरक्षण देण्यात यावे
- मराठ्यांना आरक्षण मिळावे परंतु ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता
- आदिवासींचे आरक्षणाचा कोटा वाढवण्यात यावा. त्यात धनगर व हलबांना आरक्षण देण्यात यावे.
- बुद्धगया येथील महबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे.
- बौद्ध, मुस्लीम, सिख, इसाई, जैन, लिंगायत यांच्यावर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी कम्युनल रॉयट्स प्रोटेक्शन कायदा बनविण्यात यावा.
- डॉ. आंबेडकर बौद्ध विद्यापीठ व पाली विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी.
पुरंदरे यांना देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घेण्यात यावा.