नरखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:16+5:302020-12-02T04:11:16+5:30
मेंढला : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना विशेष महत्त्व आहे. मात्र, मेंढला परिसरासह नरखेड तालुक्यातील बहुतांश पांदण रस्त्यांची दैनावस्था झाली ...

नरखेड तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
मेंढला : शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांदण रस्त्यांना विशेष महत्त्व आहे. मात्र, मेंढला परिसरासह नरखेड तालुक्यातील बहुतांश पांदण रस्त्यांची दैनावस्था झाली असून, ते पावसाळ्यात चालण्याच्या लायकीचे राहत नाहीत. त्यामुळे शेतीची वहिवाट आणि शेतमालाची वाहतूक करण्यास शेतकऱ्यांना अडचणींना सामाेरे जावे लागत असल्याने या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. पांदण रस्ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत येतात. त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी जिल्हा परिषद सदस्यांकडे करतात, परंतु कुणीही त्या मागणीकडे लक्ष देत नाही. प्रसंगी निधी उपलब्ध हाेत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची बाेळवण केली जाते. शेतकरी व बैलजाेडींचे दरवर्षी हाेणारे हाल लक्षात घेता, तालुक्यातील पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.