अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात चोख बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 11:34 PM2019-11-08T23:34:23+5:302019-11-09T00:00:19+5:30

अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली.

In the background of the verdict of case of Ayodhya, heavy bandobast in Nagpur | अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात चोख बंदोबस्त

अयोध्या प्रकरणी निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात चोख बंदोबस्त

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस सक्रिय : संशयित आणि सोशल मीडियावर विशेष नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्या प्रकरणाचा निकाल शनिवारी येणार आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस सक्रिय झाले असून शुक्रवारी रात्री जागोजागी नाकेबंदी करून संशयित व्यक्ती आणि वाहनांची तपासणी पोलिसांनी सुरू केली. रात्रीची गस्त वाढविण्यात आली. सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील काही विशेष भागांवरही पोलिसांनी नजर रोखली आहे.
संशयित व्यक्तींची नागपुरातील हजेरी आधीपासूनच चर्चेत राहिली आहे. समाजकंटकांकडून गडबड केली जाऊ शकते, अशी शंका गुप्तचर यंत्रणांकडून आधीच व्यक्त करण्यात आली आहे. संवेदनशिल स्थळांभोवती पोलिसांनी सुरक्षा कवच निर्माण केले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर करून नाहक वाद निर्माण करू पाहणाऱ्या उपद्रवींवरही पोलिसांनी नजर रोखली आहे. विविध जाती-धर्मातील मान्यवरांची बैठक घेऊन पोलीस आयुक्तांनी शहरातील सामाजिक सौहार्द बिघडणार नाही, यासाठी आधीपासूनच प्रयत्न चालविले आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि समाजकंटकांकडून कसला काही अनुचित प्रकार अवलंबला जात असेल, कुठे काही आक्षेपार्ह घडत असेल तर तातडीने पोलिसांना सूचित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
चिथावणीखोरांना इशारा
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शहरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची आम्हाला खात्री आहे. मात्र, कुणी समाजकंटकांनी चिथावणीखोरांनी कोणत्याही प्रकारचा उपद्रव करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमतशी बोलताना दिला.

भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी     
अयोध्येचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. हा निकाल कुणाच्याही बाजूने आल्यानंतर तो स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी.  अथवा निकाल आनंददायी आल्यानंतरही उन्माद करू नये, रस्त्यावर येऊन आनंद साजरा करून, इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाही,  याची काळजी घ्यावी. अयोध्येच्या निकालानंतर समाजात सामंजस्य रहावे, या भावनेतून विविध हिंदुत्ववादी संघटनेने विभागीय आयुक्तांना निवेदन सादर केले. जेणेकरून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिल. तशा सूचना पोलिसांना द्याव्या, अशी भावना व्यक्त केली. यावेळी महापौर नंदा जिचकार,  आमदार प्रा. अनिल सोले, आमदार विकास कुंभारे, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, प्रा. संजय भेंडे. कल्पना पांडे आदी उपस्थित होते. 

Web Title: In the background of the verdict of case of Ayodhya, heavy bandobast in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.