शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 05:24 IST

सरन्यायाधीश भूषण गवई : देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. आंबेडकर म्हणाले होते; देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे नागपुरात लोकार्पण

नागपूर : या देशाला एकच संविधान अभिप्रेत आहे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. फक्त एका राज्याकरिता वेगळी राज्यघटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिप्रेत नव्हती. त्यामुळे संसदेने जेव्हा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आले तेव्हा एकाच संविधानाने देश चालावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने संसदेने घेतलेला निर्णय एकमताने मान्य केला, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले.

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणप्रसंगी सरन्यायाधीश गवई बोलत होते.

संविधान देशाला एकसंध ठेवण्यास समर्थ

सरन्यायाधीश गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी असे संविधान तयार केले जे एकाच वेळी केंद्रीकृत आणि संघराज्यीय स्वरूपाचे आहे. युद्धाचा काळ असो वा शांततेचा, हे संविधान संपूर्ण देशाला एकसंध ठेवण्यास समर्थ आहे. संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासानंतर प्रत्येक संकटाच्या वेळी भारत एकसंघ राहू शकला. ही या संविधानाचीच किमया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्देशिका हाच संविधानाचा मुख्य गाभा 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभात म्हणाले, की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे.  उद्देशिका हाच संविधानाचा मुख्य गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी  करावा, त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील. उद्देशिकेतील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द हटविण्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या विधी महाविद्यालयातून देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी न्यायमूर्ती आणि राष्ट्रपती हिदायतुल्ला यासारखे गौरवशाली परंपरा लाभलेले विद्यार्थी होऊन गेले. यावेळी गडकरी यांनी विद्यापीठाच्या ई-ग्रंथालयासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस