शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:45 IST

भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले.

ठळक मुद्देसुधाकर गायकवाड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे नेहमीच शोषण करण्यात आले. कामगारांसंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष आपुलकी होती. ‘थिअरी आॅफ वेल्फेअर’च्या माध्यमातून त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे विचार मांडले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी कामगारांकडे व्यक्ती म्हणून पाहण्यास शिकविले, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखक व विचारवंत सुधाकर गायकवाड यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बीजभाषणादरम्यान ते बोलत होते.विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार कल्याण व नवीन आर्थिक धोरण या विषयावर या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरीभाऊ केदार हे मुख्य अतिथी होते तर अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, सन्माननीय अतिथी म्हणून कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम तसेच विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे हे उपस्थित होते. औद्योगिक क्रांतीनंतर कामगार कल्याणाची संकल्पना समोर आली. कामगारांना स्वातंत्र्य हवे, असे बाबासाहेब नेहमी म्हणायचे. मात्र असे म्हणत असताना त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांची सांगड घातली होती. त्यांनी सकारात्मक व नकारात्मक स्वातंत्र्य या संकल्पनादेखील मांडल्या होत्या. पाश्चिमात्य संशोधकांनी याच संकल्पना अनेक वर्षांनंतर जगासमोर आणल्या. कामगारांचे लोककल्याण कायद्यातून शक्य आहे. कामगारांना स्वातंत्र्य मिळत असताना त्यांना सन्मानाने जगण्याचीदेखील संधी मिळाली पाहिजे. तसेच त्यांच्या क्षमतांचा विकास झाला पाहिजे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. भांडवलदार असेपर्यंत कामगार कल्याण योजना आवश्यकच आहेत, असे सुधाकर गायकवाड म्हणाले.कामगार क्षेत्रासंदर्भात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मौलिक होते. त्यांचे विचार बोलून दाखविण्यापेक्षा ते कृतीत उतरविणे जास्त आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तनात कामगार पुढाकार घेऊ शकतात, असे बाबासाहेबांना वाटायचे. सद्यस्थितीत केंद्र सरकारचे धोरण कामगारविरोधी आहे. अशा स्थितीत बाबासाहेबांचे विचार अमलात आणण्याची आवश्यकता आहे, असे मत हरीभाऊ केदार यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ.काणे यांनीदेखील अध्यक्षीय भाषणातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या तारखेतदेखील कामगार कल्याणासाठी किती मौलिक आहेत, यावर प्रकाश टाकला. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.रमेश शंभरकर यांनी संचालन केले तर डॉ.पूरण मेश्राम यांनी आभार मानले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ