शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 22:06 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम, व्याख्यानमाला आयोजित करून तर कुणी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. मात्र सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्रेत अशी अनोखी जयंती साजरी केली.

ठळक मुद्देआयुर्वेद विद्यार्थ्यांचा उपक्रम : मागील २० वर्षांपासून सातत्य कायम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम, व्याख्यानमाला आयोजित करून तर कुणी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. मात्र सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्रेत अशी अनोखी जयंती साजरी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्यावतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी हा अनोखा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचे हे २० वर्षे आहे. शुक्रवार १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपासून या उपक्रमास सुरुवात झाली. द्रव्यगुण विभागाच्या एका सभागृहात महाविद्यालयातील पदवीचे (यूजी) ६० विद्यार्थी बसले. यात प्रथम, द्वितीय व अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. उद्घाटनसमयी ६० असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपारी ४ वाजेपर्यंत ७० वर पोहचली. सभागृहात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याने सभागृह जागा कमी पडली. आजपर्यंत विविध विषयांचा जेवढा अभ्यासक्रम झाला असेल त्या-त्या विषयांचा तेवढा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पुन्हा वाचून काढला. रात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात १०० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते. तत्पूर्वी या उपक्रमाचे उद्घाटन बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनोज गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. विजय पात्रीकर उपस्थित होते.शिक्षणाशिवाय प्रगती अशक्यच - डॉ. राजेंद्र लांबटबाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गेल्या २० वर्षांपासून सलग १८ तास अभ्यास करण्याचा हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमातून शिक्षणाशिवाय मानवाची प्रगती नाही, हा संदेश दिला जातो. या उपक्रमामुळे भविष्यात डॉक्टर बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची उजळणीही होते, अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लांबट यांनी दिली.

 

 

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीStudentविद्यार्थी