बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव उत्साहात

By Admin | Updated: January 28, 2015 01:06 IST2015-01-28T01:06:01+5:302015-01-28T01:06:01+5:30

हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन यांचा १५४ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील रस्त्यांसह, वसाहती आणि चौकांमध्ये बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त आकर्षक देखावे

Baba Tajuddin's birthday celebration | बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव उत्साहात

बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव उत्साहात

नागपूर : हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन यांचा १५४ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील रस्त्यांसह, वसाहती आणि चौकांमध्ये बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते. ठिकठिकाणी केक कापण्यात आले. या दिनानिमित्त ताजबादमध्ये नागपूरसह जबलपूर, सिवनी, मंडला, छिंदवाडा, भोपाळ, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, सूरत, अहमदाबाद, अदिलाबाद, औरंगाबाद यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले आहे.
बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता परंपरेनुसार या वर्षीही पहिला संदल गोकुळपेठ येथून राणा बाबू यांचा ताजाबाद येथे पोहचला. सकाळी १०.३० वाजता बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या कार्यालयात सूफियाना कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शाही संदल काढण्यात आला. यात मोठ्या संख्येत भाविक सहभागी होते. सायंकाळी ६ वाजता हा संदल परत ताजाबाद येथे पोहचला. ट्रस्टच्यावतीने संदलमध्ये समावेश असलेले चंदनचा लेप आणि शाही चादर समाधीवर चढविण्यात आली. रात्री ८.३० वाजता दरगाहमध्ये कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शेख हुसैन, सचिव इकबाल वेलजी, कोषाध्यक्ष अ‍ॅड. व्ही. के. फ्रान्सिस, ताजाबाद दरगाह खुद्दाम कमिटीचे अध्यक्ष अब्दुल रज्जाक ताजी प्यारू आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
१५४ किलोचा कापला केक
बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त ताजबाद दरगाह येथे सायंकाळी ५.१५ वाजता १५४ किलोचा केक कापण्यात आला. यावेळी दरगाह परिसरात असलेल्या भाविकांना या केकचे वितरण करण्यात आले. शहरात या दिनाच्यानिमित्ताने ठिकठिकाणी हिंदू-मुस्लिम एकतेची झलकही दिसून आली. नंदनवन येथे गणेशनगर मित्र परिवाराच्यावतीने महाप्रसाद वितरित करण्यात आला. जुनी शुक्रवारी येथे सर्वधर्मसमभाव समितीच्यावतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरभरातून पोहचले संदल
शहराच्या विविध परिसरातून काढण्यात आलेले संदल दरबार-ए-ताजुद्दीन येथे पोहचले. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत संदल येण्याचा क्रम सुरू होता. ताजाबाद ट्रस्टच्यावतीने काढण्यात आलेला संदल आकर्षणाचे केंद्र राहिले. दी बिट्स ग्रुपच्यावतीने काढण्यात आलेल्या संदलमध्ये विविध धर्माच्या लोकांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. (प्रतिनिधी)

Web Title: Baba Tajuddin's birthday celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.