बाबा डोंगरेने जमविली कोट्यवधीची माया

By Admin | Updated: February 23, 2015 02:42 IST2015-02-23T02:42:42+5:302015-02-23T02:42:42+5:30

प्रतिबंधित कारवाईची चॅप्टर केस बंद करण्यासाठी पाचपावली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे याला १० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली होती.

Baba dunai's collected billions of Maya | बाबा डोंगरेने जमविली कोट्यवधीची माया

बाबा डोंगरेने जमविली कोट्यवधीची माया

नागपूर : प्रतिबंधित कारवाईची चॅप्टर केस बंद करण्यासाठी पाचपावली विभागाचे सहायक पोलीस आयुक्त बाबा डोंगरे याला १० हजार रुपयांची लाच घेताना शनिवारी अटक केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डोंगरेंच्या नागपूर, चिमूर व गडचिरोली येथील घराची झडती घेतली असता कोट्यवधी रुपयांची मालमत्ता त्याच्याकडे आढळून आली. दरम्यान रविवारी डोंगरेला न्यायालयात हजर केले असता २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरोने शनिवारी बाबा डोंगरे याला अटक केली होती. त्याच्यावर जरीपटका पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सापळा कार्यवाहीनंतर अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरो नागपूरने त्याच्या मोहननगर येथील निर्मल अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये, गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथील घरी व चिमूर येथील त्याच्या ताडोबा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट व घराची झडती घेतली. नागपूर येथील घरझडतीत बाबा डोंगरे याचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खात्यात २,६७,२७२ लाख रुपये असल्याचे आढळले. घरझडतीत १० ग्रॅम सोन्याची चेन, घरगुती वापरात असलेल्या चैनीच्या वस्तू असा एकंदरीत १८,९२,७३८ रुपयांची मालमत्ता आढळली. कुरखेडा येते बाबा डोंगरे याच्या नावाने घर आहे. त्याची किंमत अंदाजे सात लाख रुपये आहे व ७७००० रुपयांची इतर मालमत्ता आढळून आली. चिमूर येथे त्याचे ३००० चौरस फुटात दुमजली घर आहे. तळमजल्यावर त्याचे बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट आहे. आठ खोल्यांमध्ये लॉजिंग आहे. बांधकामास ४० ते ५० लाख रुपये खर्च केला असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
डोंगरे प्रत्येक ठिकाणी राहिला चर्चेत
गुन्हे शाखेत कार्यरत असताना क्रिकेट सट्टा रेडमध्ये मिळालेल्या लॅपटॉपमधून महत्त्वाचा डाटा डिलीट करण्यात आला होता. त्यामुळे मोठे प्रकरण उघड होऊ शकले नाही. गडचिरोलीमध्येही एक चर्चित प्रकरणात तो गुंतलेला होता. हिंगणघाटमध्ये निरीक्षक असताना क्रिकेट बुकीच्या कारला आग लागून एका मॉडेलचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातही डोंगरे चर्चेत होता. हे प्रकरण सीआयडीकडे तपासाला पाठविले होते. सीआयडी या प्रकरणाचा तपास करण्यात अयशस्वी ठरली.

Web Title: Baba dunai's collected billions of Maya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.