शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापौरांचा आजपासून जनजागृती दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:15 IST

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. परिस्थिती बघता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापौर संदीप जोशी १५ ते २१ जुलै दरम्यान शहरात जनजागृती दौरा करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांनी राज्य शासनाच्या दिशानिर्देशांची सर्रास पायमल्ली केली. परिणामी नागपुरात गेल्या काही दिवसात कोविड - १९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बाजारात गर्दी होत आहे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. परिस्थिती बघता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापौर संदीप जोशी १५ ते २१ जुलै दरम्यान शहरात जनजागृती दौरा करणार आहेत.महापौर बाजारात जाऊन कोविड - १९ च्या दिशानिर्देशांचे पालन होते किंवा नाही याचा आढावा घेतील. झोन सभापतींसमवेत १५ जुलैला दुपारी ४ ते ७ पर्यंत महाल, गांधीबाग बाजाराचा दौरा करतील. १६ जुलैला कमाल चौक, राणी दुर्गावती, पिवळी नदी, जरीपटका, बोरगाव व मानकापूर परिसराचा दौरा दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत करतील. १७ जुलैला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत गोकुळपेठ, सदर, सीताबर्डी, गिट्टीखदान बाजाराचा दौरा करतील. १८ जुलैला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत इतवारी, दहीबाजार, पारडी, डिप्टी सिग्नल, टेलिफोन एक्स्चेंज बाजाराचा, १९ जुलैला दुपारी ४ ते संध्याकाळी ७ पर्यंत महापौर जगनाडे चौक आणि म्हाळगीनगर परिसराचा दौरा करतील. २० जुलैला खामला, धंतोली, गोपालनगर तर २१ जुलैला सक्करदरा, मानेवाडा, मेडिकल, कॉटन मार्केट आणि रामेश्वरी बाजाराचा दौरा करतील.मनपा निर्देशानुसार दुकाने सुरू करण्यासंदर्भातील काही नियम आहेत. मात्र, हे नियमही पाळले जात नाहीत. दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा व या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दुकान मालकांची आहे. त्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विनाकारण शहरात फिरत आहेत. दुचाकींवर दोन व्यक्ती तर चारचाकी वाहनात पाच-पाच व्यक्ती फिरत आहेत. परिणामी आता नागपूर शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीcorona virusकोरोना वायरस बातम्या