शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

नागपुरातील तरुणाई चैत्यभूमीवर करणार मासिक पाळीबद्दल जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 10:44 IST

नागपूरच्या तरुणाईने महापरिनिर्वाणदिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर मासिक पाळीबद्दल जनजागृती करून तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देपे बॅक टू सोसायटी महापरिनिर्वाणदिनी अनोखे अभिवादन

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते की, ‘एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची किती प्रगती झाली, यावरून ती मोजता येईल.’ बाबासाहेबांचे हेच विचार अंगीकृत करून स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नागपूरच्या तरुणाईने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. महापरिनिर्वाणदिनी मुंबईच्या चैत्यभूमीवर मासिक पाळीबद्दल जनजागृती करून तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करून महामानवास अभिवादन करण्याचा संकल्प केला आहे.नागपूरच्या प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेचे अनिकेत कुत्तरमारे, मेघा वानखेडे, उर्वशी फुलझेले, पंकज वासनिक, शितल गडलिंग, नीलेश बागडे, प्रमोद वासनिक आदी तरुण-तरुणींनी एकत्र येऊन हा आगळावेगळा संकल्प केला आहे. ‘पे बॅक टू सोसायटी’ अंतर्गत ‘मासिक पाळी- चला आपण बोलू या‘ हे अभियान ही तरुणाई राबवित आहे. याची सुरुवात सर्वप्रथम दीक्षाभूमीवरून करण्यात आली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर देशभरातील लाखो बौद्ध अनुयायी येतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. सर्वचजण मासिक पाळीबाबत जागरूकआहेतच असे नाही. दीक्षाभूमीवर राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियनातही या तरुणाईला असेच अनुभव आले. बहुतांश महिला यावर उघडपणे बोलायलाच तयार नव्हत्या. ‘सॅनेटरी नॅपकिक’बद्दलही त्यांना माहिती नव्हती. दीक्षाभूमीवर महिलांसोबत या विषयावर तरुणी ममोकळेपणाने बोलल्या. गरजू महिलांना सॅनटरी नॅपकिन वितरित केल्या. तोच धागा पकडून आता मुंबईच्या चैत्यभूमीवरही अशाच प्रकारची जनजागृती करण्यात येणार आहे. चैत्यभूमीवर महिलांसोबत या तरुणी मासिक पाळीबद्दल मोकळेपणाने बोलतील. तसेच गरजू महिलांना सॅनेटरी नॅपकिन वाटप करतील. यासोबतच दहा हजार भोजनाचे पॅकेटही वितरित करण्यात येणार आहेत.

सोशल मीडियाद्वारे नागपूर-मुंबईची तरुणाई एकत्र‘पे बॅक टू सोसायटी’ अंतर्गत दीक्षाभूमीवर राबविण्यात आलेल्या सॅनेटरी नॅपकिन्सच्या जनजागृतीबद्दलची माहिती व फोटो नागपूरच्या तरुणांनी सोशल मीडियावर अपलोड केले. तेव्हा त्याला देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेषत: तरुणांनी याचे स्वागत केले. यातच मुंबईच्या तरुणाईने याचे विशेष स्वागत करून चैत्यभूमीवरही हे अभियान मिळून राबविण्याबाबत विनंती केली. त्यानुसार मुंबईच्या वैशाली भालेराव, स्वाती भालेराव, आम्रपाली जाधव, अपेक्षा पवार, आम्रपाली घारे, उज्ज्वला दाभाडे, वैभव पोटे, वैभव कंबळे आदी तरुण या अभियानात सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Healthआरोग्य