सुलेखा कुंभारे, विजय बारसे यांना ‘लोकमाता पुरस्कार’ प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:21+5:302021-02-05T04:47:21+5:30
- अपंग, महिला, बाल विकास संस्थाही पुस्काराने सन्मानित लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक ...

सुलेखा कुंभारे, विजय बारसे यांना ‘लोकमाता पुरस्कार’ प्रदान
- अपंग, महिला, बाल विकास संस्थाही पुस्काराने सन्मानित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माजी मंत्री सुलेखा कुंभारे, प्रा. विजय बारसे व अपंग, महिला बाल विकास संस्थेला लोकमाता सुमतीताई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सुलेखा कुंभारे यांचे मोठे योगदान आहे. प्रा. विजय बारसे यांनी प्राध्यापकी करताना झोपडपट्टीतील मुलांना व्यसनांपासून दूर करीत त्यांच्या खिलाडू वृत्ती निर्माण केली. आज तीच मुले आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव मोठे करत आहेत, तर अपंग, महिला, बाल विकास संस्थेने दिव्यांगांच्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. त्याच कारणाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरवर्षी हा पुरस्कार सुमतीताई सुकळीकर यांच्या जयंतीला अर्थात २४ डिसेंबरला प्रदान करण्यात येतो. मात्र, कोरोना काळामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने हा पुरस्कार संबंधित मानकरींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष कुंदा विजयकर यांनी सर्व विजेत्यांचे आभार मानले. यावेळी प्रतिष्ठानच्या सचिव ज्योत्स्ना पंडित, उपाध्यक्ष डॉ. सुधीर कुन्नावार, कोषाध्यक्ष डॉ. प्रवीण गादेवार, राजू मोरेणे, सुजित गाडे उपस्थित होते.