शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ साहित्य संघाचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:17 IST

विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृत केले जात असून यावर्षी अशा १८ मानकऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वि.सा. संघाच्या वर्धापन दिन समारंभात ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्यावतिने देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१८ मान्यवरांचा होणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृत केले जात असून यावर्षी अशा १८ मानकऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वि.सा. संघाच्या वर्धापन दिन समारंभात ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्यावतिने देण्यात आली आहे.येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी वि.सा. संघाचा ९६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्या समारंभात हे पुरस्कार मान्यवरांना देण्यात येतील. यामध्ये ज्येष्ठ लेखिका सुप्रिया अय्यर यांना पु.य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, श्रीपाद कोठे यांना मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार, डॉ. शिरीष देशपांडे यांना अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मचरित्र लेखन पुरस्कार, डॉ. अमृता इंदुरकर यांना कुसुमानिल स्मृती समीक्षा लेखन पुरस्कार, इरफान शेख यांना सर्वोत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार, वसंत बाहोकर यांना वा.कृ. चोरघडे स्मृती कथालेखन पुरस्कार, डॉ. विजया फडणीस यांना य.खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार, डॉ. संजय नाथे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती लेखन पुरस्कार, गंगाधर ढोबळे यांना संत गाडगेबाबा स्मृती लेखन पुरस्कार, डॉ. प्रमोद गारोडे यांना मा.गो. देशमुख स्मृती संत साहित्य पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय अविनाश पोईनकर व संघमित्रा खंडारे यांना नवोदित लेखन पुरस्कार, डॉ. हृषिकेश गुप्ते, बरखा माथुर, दा.गो. काळे, डॉ. प्रवीण महाजन, प्रमोद वडनेरकर यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार घोषित करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विशेष पारितोषिक यावर्षी देण्यात येणार असून छायाचित्रकार शेखर सोनी यांना हा पुरस्कार देण्यात येईल.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर