पुरस्काराने समाजासाठी जगण्याचे बळ मिळाले

By Admin | Updated: May 29, 2014 03:28 IST2014-05-29T03:28:43+5:302014-05-29T03:28:43+5:30

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अग्रणी क्रांतीकारक स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त

The award has the power to live for the community | पुरस्काराने समाजासाठी जगण्याचे बळ मिळाले

पुरस्काराने समाजासाठी जगण्याचे बळ मिळाले

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील अग्रणी क्रांतीकारक स्वा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर स्मारक समितीतर्फे सामाजिक अभिसरण पुरस्कार व तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झटणार्‍या तसेच स्वातंत्र्याच्या यज्ञात समस्त कु टुंबाचे योगदान असणार्‍या यमुनाबाई, येसुबाई व शांताबाई सावरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती प्रवीण चिंधुजी दराडे आणि आदिवासी विकास आयुक्तालयाच्या अपर आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांना सामाजिक अभिसरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार समारंभ विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी प्रज्ञा प्रमोद राऊत यांना तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सावरकर प्रेमींच्या भरगच्च उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी सत्कारमूर्तींंसह समितीचे अध्यक्ष अशोक ठाकरे, डॉ. राजेंद्र नाईकवाडे, शिरीष दामले प्रामुख्याने उपस्थित होते. शासकीय नोकरीच्या माध्यमातून समाजसेवा करणारे आणि नागपूरातील अनेक सामाजिक संस्थाविषयी कृतज्ञता असलेल्या उच्चपदस्थ प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे तसेच अंध व अपंगांसाठी कार्य करणार्‍या प्रज्ञा राऊत यांच्या कार्याचा परिचय डॉ. नाईकवाडे यांनी करुन दिला. यावेळी प्रवीण दराडे यांनी स्वा. सावरकरांच्या महान कार्याला मनोगतातूीन सलाम केला. सावरकरांच्या विचारांचे अनुकरण करीत आजच्या युवापिढीने कार्य करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. पल्लवी दराडे यांनी हा पुरस्कार लाभल्याबद्दल आनंद व्यक्त केला. लहानपणापासून पालकांच्या सुसंस्कारामुळे आपण चांगले काम करु शकलो. यापुढेही आपण सामाजिक दायित्वाच्या भावनेतून कार्य करीत राहू, असे त्या म्हणाल्या. प्रज्ञा राऊत यांनी आपल्या संस्थेमार्फत सुरु असलेले कार्य स्वामी विवेकानंदांच्या संदेशाचे पालन असल्याचे सांगितले. संत तुकारामांच्या उपदेशानुसार यापुढेही आपण काम करीत राहणार, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी मंजिरी वैद्य हिने सावरकरांचे शतजन्म शेधतानाहे गीत सादर केले. जयंत उपगडे यांनी जयोस्तुतेगीत सादर केले. अशोक ठाकरे यांनी आभार मानले.

अंकिता पाचखेडे हिने संचालन केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वेशभुषेत यावेळी नामदेव गणपती कार्यक्रमात आकर्षणाचा विषय ठरले. याप्रसंगी पल्लवी दराडे यांचे माता-पिता हेमा व हरिश कांबळे, डॉ. वि. स. जोग प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The award has the power to live for the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.