उमरेडमध्ये संविधानाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:39+5:302020-11-28T04:07:39+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष आर. बी. गजघाटे यांनी धम्म ध्वजारोहण केले. यावेळी शत्रुघ्न ...

Awakening of the Constitution in Umred | उमरेडमध्ये संविधानाचा जागर

उमरेडमध्ये संविधानाचा जागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समितीचे अध्यक्ष आर. बी. गजघाटे यांनी धम्म ध्वजारोहण केले. यावेळी शत्रुघ्न शंभरकर, ए. आर. मेश्राम, ए. एल. मेंढे, कृष्णाजी बुलकुंदे, एस. डी. बावनगडे, अभिमन्यू गजघाटे, पी. एल. मेंढे, माया शंभरकर, माया ठवरे, एस. पी. मेश्राम, अंकुश मेश्राम, बालकदास म्हैसकर, सुरेश मंडपे, सुनिता डांगे, अलका धारगावे आदींची उपस्थिती होती.

रणधीरसिंह भदोरिया महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी प्राचार्या जयश्री तिवारी, प्रा. सुरेखा जुनघरे, प्रा. आकाश पांडे, प्रा. प्रमोद मेश्राम, प्रा. खुशबू घिये, प्रा. रूपाली भिवापूरकर, लक्ष्मण फटिंग, रजत वैद्य, राजेश खोपे आदींची उपस्थिती होती.

.....

खापरखेडा परिसरात संविधान दिन

खापरखेडा : परिसरात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात आणि सामाजिक, राजकीय पक्षाच्या वतीने संविधानाचा जागर करीत लोकशाहीला नमन करण्यात आले. भानेगाव ग्रामपंचायत येथे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सरपंच रवींद्र चिखले यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्य विजय वासनिक, सतीश शिंदूरकर, सुभाष चांदसरोदे, कल्पना गजभिये, ज्योती मालाधरी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Awakening of the Constitution in Umred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.