औषधांसाठी तासन्तास प्रतीक्षा

By Admin | Updated: September 7, 2016 02:44 IST2016-09-07T02:44:20+5:302016-09-07T02:44:20+5:30

ब्रिटिशांच्या काळातील मेयो रुग्णालय आज सुधारत असले तरी स्थिती वाईटच आहे. येथे औषधांच्या वितरणासाठी केवळ दोनच खिडक्या आहेत.

Awaiting hours for medicines | औषधांसाठी तासन्तास प्रतीक्षा

औषधांसाठी तासन्तास प्रतीक्षा

मेयो रुग्णालयात रुग्णांना फटका : दोनच खिडक्यातून होते वाटप
नागपूर : ब्रिटिशांच्या काळातील मेयो रुग्णालय आज सुधारत असले तरी स्थिती वाईटच आहे. येथे औषधांच्या वितरणासाठी केवळ दोनच खिडक्या आहेत. परिणामी, खिडक्यांवर रुग्णांची गर्दी उसळते. रुग्णांना दुखणे सहन करीत एक ते दीड तास उभे राहावे लागते. त्यातही लिहून दिलेले औषध मिळेल का ही शंका असते.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विखुरलेल्या इमारतीमुळे रुग्णसेवेत सुलभता व गुणात्मकता बाधित होत आहे. असे असताना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. या रुग्णालयात विदर्भच नाहीतर आजूबाजूच्या पाच राज्यांमधून रुग्ण येतात. येथील अपघात विभाग गेल्या वर्षी रुग्णसेवेतून कमी झाला आहे. त्याची जागा आता नव्या अपघात विभागाने घेतली आहे. या विभागाला बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) जोडण्यात आला आहे.
ओपीडीमध्ये रोज दीड हजारावर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्ण हे दारिद्र्यरेषेखालील असतात. येथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी आहे. शासनाच्या नियमानुसार या दोन्ही प्रकारातील रुग्णांना नि:शुल्क औषधे देण्याचा नियम आहे. परंतु रुग्णांच्या पदरी मोजकीच औषधे पडतात. इतर औषधांसाठी रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. रुग्णालयात १३ क्रमांकाच्या खिडकीतून औषधांचे वितरण केले जाते. मात्र येथे दोनच खिडक्या आहेत. यामुळे गर्दी वाढते. येथे रुग्णांना बसायला खुर्च्या किंवा टेबल नाहीत. दुखणे सहन करीत रांगेत उभे रहावे लागते. (प्रतिनिधी)

Web Title: Awaiting hours for medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.