शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

‘अवनी’च्या मादी बछडीला जंगलात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 9:43 PM

पांढरकवडा येथे शूटरच्या माध्यमातून मारण्यात आलेलीे वाघीण ‘अवनी’ टी-१ च्या मादी बछडीला मूळ अधिवासात जंगलामध्ये सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देशिकार करण्याइतपत झाली सक्षम : वनविभागाचा एनटीसीएकडे प्रस्ताव, प्राधिकरणाच्या मंजुरीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पांढरकवडा येथे शूटरच्या माध्यमातून मारण्यात आलेलीे वाघीण ‘अवनी’ टी-१ च्या मादी बछडीला मूळ अधिवासात जंगलामध्ये सोडण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) नवी दिल्ली यांच्याकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच सी-१ या मादी बछड्याला पावसाळ्यानंतर सुरक्षित वनक्षेत्रात सोडले जाणार आहे.पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील १३ गावकऱ्यांवर हल्ला करून ठार केल्याने टी-१ 'अवनी' या वाघिणीला गोळी घालून ठार मारण्यात आले होते. यामुळे या वाघिणीचे बछडे अनाथ झाले होते. या घटनेनंतर सुमारे एक वर्षाने अवनीची बछडी असलेली वाघीण सी-1 ला रेस्क्यू करून डिसेंबर-२०१८ मध्ये पेंचमधील चार हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या ओपनिंग क्लोजरमध्ये ठेवण्यात आले होते. वन कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली तिला शिकारीचे प्रशिक्षण देणे सुरू होते. मागील जुलै-२०१९ मध्ये तज्ज्ञांच्या झालेल्या बैठकीत या वाघिणीला तिच्या मूळ अधिवासात सोडण्याच्या विषयावर चर्चा झाली होती. मात्र एनटीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही त्रुटी दर्शविण्यात आल्या होत्या. त्यामुळे २०१९ मध्ये या वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले नव्हते. परंतु नियमित प्रशिक्षणातून त्रुटी दूर झाल्याने आता तिला सुरक्षित अधिवासात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ती आता स्वत:हून शिकार करण्यास सक्षम झाल्याचा अभिप्राय आला आहे. अलीकडेच ७ जुलैला झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीत या विषयावर एकमत झाले, यामुळे या मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. आता पुढील प्रक्रियेसाठी एनटीसीएच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यासाठी एक प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे.आता नजरा एनटीसीएच्या मंजुरीकडेवनविभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अवनी वाघिणीला शूटरकडून गोळी घालून ठार मारण्यात आल्याचा प्रसंग वनविभागाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. एचडी-१ ही अवनीची बछडी असल्याने तिला सुरक्षितपणे जंगलात सोडणे हे वनविभागासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच तिला निसर्गमुक्त केले जाणार आहे. यासाठी काळजीपूर्वक प्रस्ताव तयार करण्यात आला असून आता एनटीसीएच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :TigerवाघAvani Tigressअवनी वाघीण