महिला प्रवाशांसाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध

By Admin | Updated: July 8, 2015 02:50 IST2015-07-08T02:50:19+5:302015-07-08T02:50:19+5:30

महिला सशक्तीकरण धोरणानुसार रेल्वेत कार्यरत महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या रेल्वेबाबतच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन,...

Available online facility for women passengers | महिला प्रवाशांसाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध

महिला प्रवाशांसाठी आॅनलाईन तक्रारीची सुविधा उपलब्ध

हेल्पलाईन उपलब्ध : त्वरित होईल समस्येचे निराकरण
नागपूर : महिला सशक्तीकरण धोरणानुसार रेल्वेत कार्यरत महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांच्या रेल्वेबाबतच्या सर्व प्रकारच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन, मॅसेज, टोल फ्री क्रमांक या सुविधा रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत.
महिला कर्मचारी आणि महिला प्रवाशांना कुठलीही समस्या उदभवल्यास त्या स्टेशन व्यवस्थापक, टीटीई, गार्डजवळ आपली तक्रार करू शकतात. याशिवाय रेल्वेच्या डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट इंडियन रेल्वेज डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईटवर तक्रार करू शकतात. एसएमएसवरून तक्रार करायची असल्यास ९१९७१७६३०९८२ या क्रमांकावर तक्रार केल्या जाऊ शकते. प्रवासात स्वच्छता, खानपान आणि आरोग्य सुविधेसाठी १३८ या हेल्पलाईनवर तसेच लिखित किंवा ई-मेलने तक्रार करण्यासाठी महाव्यवस्थापक आणि मुख्य वाणिज्य व्यवस्थापकांकडे तक्रार करता येऊ शकते. प्रवासात खानपानच्या तक्रारीसाठी १८००१११३२१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्या जाऊ शकते. तसेच नागपूर विभागात ही तक्रार करावयाची असल्यास ८६०००३६२१४ या क्रमांकावर, सुरक्षेसाठी १८२ या हेल्पलाईनवर आणि महिला सुरक्षेसाठी १८००२३३२५३४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार केल्या जाऊ शकते. तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासन मुख्यालय आणि रेल्वे विभागात नेमणुक केलेल्या अधिकाऱ्यांतर्फे उच्चस्तरार प्रवाशांच्या तक्रारीचे समाधान करण्यात येईल. हेल्पलाईन क्रमांक २४ तास उपलब्ध राहणार असून महिला प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Available online facility for women passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.