ऑटोला लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:14 IST2021-03-13T04:14:15+5:302021-03-13T04:14:15+5:30

नागपूर : अजनीमध्ये ऑटोला आग लावणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भगवाननगर येथील रहिवासी आकाश मरसकोल्हे यांनी ११ ...

Auto fire | ऑटोला लावली आग

ऑटोला लावली आग

नागपूर : अजनीमध्ये ऑटोला आग लावणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भगवाननगर येथील रहिवासी आकाश मरसकोल्हे यांनी ११ मार्चला रात्री घरासमोर आपला ऑटो उभा केला होता. आरोपी हेमराज ऊर्फ सोनू रामदास वानखेडे (२७) रा. न्यू कैलाशनगर याने ऑटोच्या टबला आग लावली. अजनी पोलिसांनी आरोपी वानखेडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकी चोरट्याला अटक

नागपूर : शांतिनगर पोलिसांनी दुचाकीच्या चोरीतील युवकास अटक केली आहे. करण प्रकाश जाधव (२०) रा. प्रेमनगर, शांतिनगर असे आरोपीचे नाव आहे. लालगंजच्या बारईपुरा येथे किरायाने राहणाऱ्या पीयूष केजरीवाल यांची दुचाकी चोरीला गेली होती. पोलिसांना चोरीत करणचा हात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी करणला अटक केली. त्याच्याकडून दुचाकी आणि चोरी केलेली इतर दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई उपनिरीक्षक जामदार, अरुण बकाल, अब्दुल शेख, विनोद समदुरे, प्रवीण जाधव, आशिष निकोसे यांनी केली.

................

Web Title: Auto fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.