ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या नुकसानीची पाहणी सुरू ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:07 IST2020-12-25T04:07:19+5:302020-12-25T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. ...

ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या नुकसानीची पाहणी सुरू ()
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दाखल झाले आहे. गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील कामठी, पाारशिवनी व मौदा या तालुक्यातील साोनेगाव राजा, निलज व सिंगारदीप या गावांना भेट दिली. यावेळी कृषी, पायाभूत सुविधा, वीज व अन्य नुकसानीची पाहणी केली. यावेळी पथकाने शेतकऱ्यांशी चर्चाही केली. दरम्यान, ऑगस्टमध्ये आलेल्या पुराची पाहणी आता डिसेंबरमध्ये होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोषही व्यक्त केला.
केंद्रातून आलेल्या पथकाची दोन गटात विभागणी झाली असून यातील एका पथकाने नागपूर जिल्ह्याची गुरुवारी पाहणी केली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही पााहणी करण्यात आली. त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प. चे सीईओ योगेश कुंभेजकर प्रामुख्याने उपस्थित होते. या पथकाने कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरील गावांची पाहणी केली. गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झाालेली प्राथमिक मदत, सर्वेक्षण, पूरग्रस्तांची मागणी याबाबतची माहिती जाणून घेतली. याचवेळी पारशिवनी तालुक्यातील सालई माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी पाहणी केली. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलिंद बांधवकर, सहायक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए.एस. महाजन यांच्यासह मंडळ अधिकारी राजेश घुडे, तलाठी विश्वजित पुरामकर पाहणी पथकात होते. २०१८ मध्ये पूर्ण झाले होते......... मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ ऑगस्ट राेजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. दुसरे एक पथक गडचिरोलीची पाहणी करीत आहे.
बॉक्स
शुक्रवारी चंद्रपूर, भंडाऱ्याची पाहणी
केंद्रीय पथक उद्या शुक्रवारी चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीची पाहणी करेल. यानंतर शनिवारी २६ डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात बैठक होईल.
बॉक्स
जिल्ह्यातील ६१ गावांना बसला होता फटका
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नागपूर जिल्ह्यातील पाच ताालुक्यातील ६१ गावे बाधित झाली होती. तर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यातील ९०,८५८ नागरिक यामुळे बाधित झाले होते. २२,९९४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले होते.