प्रेक्षाध्यान म्हणजे महान अवयवदान :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:08 IST2021-01-18T04:08:41+5:302021-01-18T04:08:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : श्री जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे गुरुदेव आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या आशीर्वादाने सती शिरोमणी मातृहृदया साध्वीप्रमुख ...

प्रेक्षाध्यान म्हणजे महान अवयवदान :
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री जैन श्वेतांबर तेरापंथ धर्मसंघाचे गुरुदेव आचार्यश्री महाश्रमणजी यांच्या आशीर्वादाने सती शिरोमणी मातृहृदया साध्वीप्रमुख श्री कनकप्रभा ५७ साध्वींच्या धवल सेनेसोबत अहिंसा यात्रा करीत हैदराबाद ते रायपूरकडे विहार करीत आहेत. दरम्यान, त्या नागपूरच्या महालगाव येथील दिलीप शाह यांचे वेअरहाऊस येथे पोहोचल्या. महाप्रज्ञ प्रेक्षाध्यान केंद्र आणि नागपूर प्रेक्षा वाहिनीच्या ३० सदस्यांनी साध्वींचे दर्शन घेतले. यावेळी सदस्यांनी प्रेक्षागीत सादर केले. महाप्रज्ञ प्रेक्षाध्यानाचे प्रशिक्षक आनंदमल सेठिया यांनी केंद्रात गेल्या नऊ वर्षापासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. प्रेक्षा वाहिनीचे संवाहक श्रद्धा जवेरी यांनी प्रेक्षावाहिनीचा अहवाल सादर केला. सभाध्यक्ष सुनील छाजेड यांनी केंद्राला अ श्रेणीत आणण्याचे प्रयत्न् केले जात असल्याचे सांगितले. साध्वी शुभ्र यशाची यांनी प्रेक्षाध्यानाच्या उपयोगितेवर प्रकाश टाकला. साध्वी प्रमुख यांनी प्रेक्षाध्यानाच्या इतिहासावर प्रकाश टाकत अवयवदान हे संपूर्ण मानव समाजासाठी कल्याणकारी असल्याचे सांगितले. प्रशिक्षक अमित जैन यांनी संचालन केले.