शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 9:29 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील वादग्रस्त ५० वर रेती घाटांचे लिलाव रद्द केले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. जिल्हा प्रशासनाने नियमांची पायमल्ली करून रेती घाटांचे लिलाव जाहीर केले होते.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : अवैध पद्धतीने सुरू केली होती प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नागपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील वादग्रस्त ५० वर रेती घाटांचे लिलाव रद्द केले. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी हा निर्णय दिला. जिल्हा प्रशासनाने नियमांची पायमल्ली करून रेती घाटांचे लिलाव जाहीर केले होते.लिलाव रद्द झालेले रेती घाट सावनेर, पारशिवनी, मौदा, कामठी (नागपूर जिल्हा), गोंदिया, तिरोडा, सडक अर्जुनी, आमगाव, अर्जुनी मोरगाव (गोंदिया जिल्हा), लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पवनी, साकोली व तुमसर (भंडारा जिल्हा) येथील आहेत. संबंधित घाटांच्या लिलावाविरुद्ध ज्योती चलपे, श्रीराम ढोके, छाया बानसिंगे (नागपूर जिल्हा), सपना सूर्यवंशी, दयाराम आगासे (गोंदिया जिल्हा) व पुनम काटेखाये (भंडारा जिल्हा) यांनी तीन रिट याचिका दाखल केल्या होत्या. तिन्ही याचिका मंजूर झाल्या. यावर्षी तिन्ही जिल्ह्यांत कमी पाऊस पडला. त्यामुळे या क्षेत्रातील नद्यांमध्ये रेतीचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत नद्यांमधून रेतीचा उपसा केल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होईल. ३ जानेवारी २०१८ रोजी महसूल व वन विभागाने प्रस्ताव जारी करून खनिकर्मामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी निकष निश्चित केले आहेत. या क्षेत्रातील रेती घाटांचे लिलाव जाहीर करताना त्या निकषांचे पालन झाले नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, अ‍ॅड. मोहित खजांची व अ‍ॅड. महेश धात्रक यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :sandवाळूHigh Courtउच्च न्यायालय