एयुएबीचे सरकारविरोधात ‘लंच अवर डेमान्स्ट्रेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST2021-06-26T04:07:59+5:302021-06-26T04:07:59+5:30

- बीएसएनएल मुख्यालयात निदर्शने नागपूर : बीएसएनएल व्यवस्थापन आणि सरकारच्या बीएसएनएल धोरणाच्या विरोधात ऑल युनियन्स असोसिएशन ऑफ बीएसएनएल (एयुएबी)ने ...

AUAB launches 'lunch hour demonstration' against government | एयुएबीचे सरकारविरोधात ‘लंच अवर डेमान्स्ट्रेशन’

एयुएबीचे सरकारविरोधात ‘लंच अवर डेमान्स्ट्रेशन’

- बीएसएनएल मुख्यालयात निदर्शने

नागपूर : बीएसएनएल व्यवस्थापन आणि सरकारच्या बीएसएनएल धोरणाच्या विरोधात ऑल युनियन्स असोसिएशन ऑफ बीएसएनएल (एयुएबी)ने ‘लंच अवर डेमान्स्ट्रेशन’ करत मुख्यालयात जोरदार निदर्शने केली.

यावेळी सर्वत्र फोरजी सुरू असताना बीएसएनएल अजूनही थ्रीजी यंत्रणेवरच चालत आहे. लवकरच फाईव्हजी सुद्धा येणार आहे. मात्र, बीएसएनएलला अजूनही फोरजी स्पेक्ट्रम मिळालेला नाही. त्यामुळे, कंपनीला तोटा सहन करावा लागत आहे. व्यवस्थापनाचे याकडे दुर्लक्ष आहे. ५० टक्के कर्मचाऱ्यांनी व्हीआरएस घेतला आहे. गेल्या २७ महिन्यांपासून एक महिन्याच्या अंतराने पगाराचे वाटप केले जात आहे. सरकारही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या निदर्शनात विविध संघटनांचे नरेश कुंभारे, प्रशांत लांडगे, आशिष जैन, समीर खरे, सचिन भस्मे, हरेंद्र पांडे, पंचम गायकवाड, प्रफुल्ल येणुरकर, प्रशांत अंबादे, संतोष अहिर, राजेंद्र बागडे, धनराज भगत, बालकदास गजभिये, रवींद्र पाटील, सुनित उपाध्याय, शेंडे, प्रणय फाळे, राजू कोकोडे, गिरीश गुलगुलवार, मिश्रा, रोशन बंसोड, विवेक चावला, हितेंद्र मेश्राम, सिद्धेश केळापुरे, जितेंद्र शंभरकर, मकरंद, करडे उपस्थित होते.

..............

Web Title: AUAB launches 'lunch hour demonstration' against government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.