व्हीआयएच्या अध्यक्षपदी अतुल पांडे बिनविरोध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 10:35 PM2018-06-30T22:35:18+5:302018-06-30T22:41:14+5:30

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) वार्षिक सभेत उद्योजक अतुल पांडे यांची २०१८-१९ या वर्षाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. व्हीआयएची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात शनिवार, ३० जूनला पार पडली. सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी अतुल पांडे आणि सचिवपदी डॉ. सुहास बुद्धे यांची निवड करण्यात आली.

Atul Pandey unanimously elected VIA President | व्हीआयएच्या अध्यक्षपदी अतुल पांडे बिनविरोध 

व्हीआयएच्या अध्यक्षपदी अतुल पांडे बिनविरोध 

Next
ठळक मुद्देउद्योजकांच्या विकासासाठी कार्यरत राहणार : डॉ. सुहास बुद्धे सचिव

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (व्हीआयए) वार्षिक सभेत उद्योजक अतुल पांडे यांची २०१८-१९ या वर्षाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली. व्हीआयएची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात शनिवार, ३० जूनला पार पडली. सभेत सर्वानुमते अध्यक्षपदी अतुल पांडे आणि सचिवपदी डॉ. सुहास बुद्धे यांची निवड करण्यात आली.
पदभार स्वीकारल्यानंतर पांडे म्हणाले, संपूर्ण देशात महाराष्ट्राचा औद्योगिक विकास वेगाने होत आहे. विदर्भातील उद्योजकांच्या समस्या आणि अडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्याचे प्रथम कर्तव्य आहे. उद्योजकांच्या विकासासाठी निरंतर कार्यरत राहणार आहे. उद्योजकांच्या उल्लेखनीय विकासासाठी व्यवस्थापक आणि तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहील. व्हीआयएची कन्व्हेन्शन सेंटरची मागणी आहे. कार्यशाळा, बिझनेस कॉन्फरन्स आणि प्रदर्शनासाठी व्हीआयएने मिहानमध्ये ४३ एकरची मागणी केली आहे. त्याचा पाठपुरावा करणार आहे. मिहानमध्ये अनेक मोठे उद्योग सुरू होत आहेत. त्याचा फायदा विदर्भातील उद्योजकांना होईल.
व्हीआयएच्या अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये माजी अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, उपाध्यक्ष सुरेश राठी, राजेंद्रकुमार बी गोयनका, आदित्य सराफ, कोषाध्यक्ष गिरीश देवधर, सहसचिव पंकज बक्षी यांचा समावेश आहे. कार्यकारिणी समिती सदस्यांमध्ये आश्रयदाता सदस्य हरगोविंद बजाज, सुरेश अग्रवाल, प्रवीण तापडिया, रोहित बजाज, सत्यनारायण नुवाल, विशाल अग्रवाल, अशोक सी अग्रवाल, अनिल पारख, राकेश खुराणा, असीम सिन्हा, हेमंत लोढा, प्रशांत कुमार मोहता, ओ.एस. बागडिया, गिरीधारी मंत्री, रोहित अग्रवाल, आकाश अग्रवाल, गौरव सारडा, सुरेंद्र लोढा, प्रतीक तापडिया, शैलेंद्र सूचक, यज्ञेश सुरजन आणि स्वीकृत सदस्यांमध्ये नरेश जखोटिया व आशिष चंदाराणा यांचा समावेश आहे.

Web Title: Atul Pandey unanimously elected VIA President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर