शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचे सुपुत्र अतुल चांदूरकर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 29, 2025 17:29 IST

Nagpur : केंद्र सरकारने मंजूर केली कॉलेजियमची शिफारस

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भाचे सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांची गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने यासंदर्भात गेल्या सोमवारी केलेली शिफारस केंद्र सरकारद्वारे मंजूर करण्यात आली.

न्या. चांदूरकर यांची दि. २१ जून २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २ मार्च २०१६ रोजी त्यांना सेवेत कायम करण्यात आले. त्यांनी पुणे येथील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण व नेस वाडिया महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले तर, आयएलएस विधी महाविद्यालयातून एलएल.बी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी दि. २१ जुलै १९८८ पासून मुंबई येथील वरिष्ठ ॲड. बी. एन. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. पुढे ते १९९२ मध्ये नागपुरात स्थायिक झाले. त्यांनी येथील विविध न्यायालयांमध्ये वकिली करताना संवैधानिक, दिवाणी, फौजदारी, प्रशासकीय असे विविध प्रकारचे विषय प्रभावीपणे हाताळले. यापूर्वी विदर्भातून न्या. मोहम्मद हिदायतुल्ला, न्या. जनार्दन मुधोळकर, न्या. ए. पी. सेन, न्या. विकास सिरपूरकर, न्या. शरद बोबडे व न्या. भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे. यापैकी न्या. हिदायतुल्ला व न्या. बोबडे यांनी सरन्यायाधीश पद भूषविले व सध्या न्या. गवई सरन्यायाधीशपदी कार्यरत आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयnagpurनागपूर