शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  भाजप कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 23:55 IST

मालमत्तेच्या हक्काच्या वादातून सोमवारी दुपारी गणेशपेठेतील भाजप कार्यालयावर एका महिलेने साथीदाराच्या मदतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देमहिलेसह दोघांवर गुन्हा दाखल : टिळक पुतळा परिसरात तणाव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मालमत्तेच्या हक्काच्या वादातून सोमवारी दुपारी गणेशपेठेतील भाजप कार्यालयावर एका महिलेने साथीदाराच्या मदतीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही वेळेसाठी तणाव निर्माण झाला होता. आमदार गिरीश व्यास यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंतर मीना गुप्ता आणि राजू काळमेघ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.टिळक पुतळ्याजवळ भाजप कार्यालय होते. ही इमारत पडल्यामुळे कार्यालय गणेशपेठेतील एका अपार्टमेंटमध्ये हलविण्यात आले. पं. दीनदयाल उपाध्याय स्मृती ट्रस्टने २०११ मध्ये टिळक पुतळ्याजवळच्या कार्यालयालगतची महादेव प्रसाद गुप्ता यांची इमारत विकत घेतली. या इमारतीच्या बहुतांश भागावर ट्रस्टचा ताबा आहे. इमारतीच्या वरच्या माळ्यावर गुप्ता यांची सून मीना गुप्ता रेस्टॉरेंट चालविते. तिने मालमत्ता दुसऱ्याला विकण्या किंवा भाड्याने देण्याच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर न्यायालयाने स्थगनादेश दिला आहे. सोमवारी दुपारी मीना तिचा साथीदार राजू काळमेघसोबत तेथे पोहचली. तिने भाजप कार्यालयाला लावलेले कुलूप तोडून कब्जा करण्याचा प्रयत्न केला. ते माहीत पडताच मोठ्या संख्येत भाजप कार्यकर्ते तेथे पोहोचले. त्यांनी पोलिसांना कळवून मीना तसेच तिच्या साथीदाराला अटक करण्याची मागणी केली. गणेशपेठ पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मोठा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मीना, तिचा साथीदार आणि अन्य काहींना पोलीस ठाण्यात नेले. तेथे दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आणि कागदपत्रे तपासल्यानंतर आ. गिरीश व्यास यांची तक्रार नोंदवून मीना गुप्ता आणि राजू काळमेघविरुद्ध जबरदस्तीने कब्जा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.अनेक दिवसांपासून प्रयत्नआ. व्यास याच्या माहितीप्रमाणे मीनाने यापूर्वी मागच्या बाजूची भिंत तोडून आत शिरण्याचा आणि त्या खोलीत आपले कुलूप लावण्याचा प्रयत्न केला होता. एका खोलीत भाजपचे निवडणूक प्रचार साहित्य ठेवण्यात आले आहे. त्याचे कुलूप तोडण्याचा मीना अणि तिच्या साथीदाराने प्रयत्न केला. तेथे लाँड्री चालविणाऱ्यानेही भाजपला यापूर्वीच या दुकानांचा ताबा दिल्याचे सांगितले. भाजप नेत्यांनी सादर केलेली कागदपत्र तपासली असता त्यातून जमिनीच्या मूळ वारसदारांची सहमती असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पोलिसांनी आता मीना आणि साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBJPभाजपा