गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST2021-06-28T04:07:32+5:302021-06-28T04:07:32+5:30
नरखेड : शहरातील आठवडी बाजारात असलेल्या कडूनिंबाच्या झाडाच्या फांदीला दुपट्ट्याच्या मदतीने एकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ...

गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न
नरखेड : शहरातील आठवडी बाजारात असलेल्या कडूनिंबाच्या झाडाच्या फांदीला दुपट्ट्याच्या मदतीने एकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून समजूत काढत त्याला वाचविले. ही घटना रविवारी (दि. २७) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
सेवाराम सलामे (४०, रा. बैतूल, मध्य प्रदेश) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. ताे त्याच्या पत्नीसाेबत सिंगारखेडा (ता. नरखेड) येथे मुलीकडे काैटुंबिक कार्यक्रमानिमित्त आला हाेता. ताे रविवारी दुपारी पत्नीसह नरखेड येथील आठवडी बाजारात आला. त्याने बाजारातील कडूनिंबाच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास लावला. ही बाब लक्षात येताच गाेलू नामक तरुणाने पाेलिसांना सूचना दिली. त्यातच घाबरलेल्या पत्नीने पाेलीस ठाण्याच्या दिशेने धाव घेतली. पाेलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून त्याला ताब्यात घेतले. स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याच्या या प्रकाराचे कारण कळू शकले नाही.