शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून दोघांच्या हत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:03 IST

प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी राहुल केशवराव सेवतकर नामक आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देनागपुरातील टिळकनगर टी पॉईंटवर थरार : अंबाझरीत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रेयसीला चिडविल्याच्या संशयावरून एका आरोपीने अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे या दोघांवर चाकूचे सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिळकनगर टी पॉईंटवर रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी राहुल केशवराव सेवतकर नामक आरोपीला अटक केली.राहुलचा मोठा भाऊ एका फायनान्स कंपनीत डेली कलेक्शनचे काम करतो. तो सध्या बाहेरगावी गेला आहे. त्यामुळे त्याने त्याचा भाऊ राहुलवर टिळकनगरातील हातठेलेवाल्याकडून रक्कम जमा करण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार, रविवारी रात्री ८.३० वाजता आरोपी राहुल त्याच्या प्रेयसीला घेऊन टिळकनगरातील गर्ल्स हॉस्टेलजवळच्या रविलाल परिहारच्या चायनिज ठेल्यावर आला. यावेळी परिहारच्या ठेल्यावर अक्षय अशोक सारवे (वय २७) आणि अंशूल प्रकाश लांडगे सूप पीत होते. ते आपसात गंमतजंमत करीत होते. राहुलच्या प्रेयसीकडे नजर गेल्याने ते दोघे तिच्याकडे पाहून हसले. त्यामुळे राहुलची प्रेयसी त्या दोघांजवळ आली आणि तिने त्यांना ‘तुम को मा-बहेन नही क्या’ म्हणत झापले. लांडगे आणि साखरेने तिला तिच्या भाषेत उत्तर दिल्यामुळे संतप्त राहुल या दोघांवर चालून आला. त्याने खिशातील चाकू काढून लांडगेवर धाव घेताच बचावासाठी लांडगे आणि साखरेने त्याचा चाकू पकडला. राहुलची प्रेयसीदेखील मधात पडली. राहुलच्या हातातील चाकू तिला लागल्याने तिच्या हातातून रक्ताची धार लागली. ते पाहून राहुल हिंसक बनला. त्याने आडवे तिडवे चाकूचे वार करून दोघांनाही जबर जखमी केले. आरडाओरड आणि शिवीगाळ ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी प्रेयसीसह पळून गेला. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरीचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहचला. तत्पूर्वीच जखमी अक्षय आणि अंशूलला बाजुच्यांनी रविनगर चौकातील डॉ. पिनाक दंदे यांच्या इस्पितळात पोहचविले होते. अक्षयच्या मानेवर डोक्यावर, पोटावर, तोंडावर गंभीर जखमा असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. ते बेशुद्धावस्थेत होते. डॉ. दंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केल्याने हे अक्षय तसेच अंशूल शुद्धीवर आले.दरम्यान अक्षयच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर