रेल्वे ‘ट्रॅक मॅन’कडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:10 IST2020-12-31T04:10:40+5:302020-12-31T04:10:40+5:30

भिवापूर : स्थानिक रेल्वेस्थानक परिसरातील घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत रेल्वेमध्ये काम करणाऱ्या ‌‘ट्रॅक ...

Attempt to torture two minor girls by railway ‘Track Man’ | रेल्वे ‘ट्रॅक मॅन’कडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न

रेल्वे ‘ट्रॅक मॅन’कडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न

भिवापूर : स्थानिक रेल्वेस्थानक परिसरातील घराच्या अंगणात खेळत असलेल्या दोन अल्पवयीन मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवत रेल्वेमध्ये काम करणाऱ्या ‌‘ट्रॅक मॅन’ने बलात्काराचा प्रयत्न केला. सदर घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उजेडात आली. मुलींनी आरडाओरड करत आरोपीच्या तावडीतून स्वत:ची मुक्तता केल्याने बलात्काराचा प्रयत्न फसला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. नरेशकुमार शौकीन (५०) रा. दिल्ली असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी नरेशकुमार हा नागभीड येथे रेल्वेमध्ये ट्रॅक मॅन म्हणून नोकरीला आहे. यापूर्वी तो अधेमधे भिवापूर येथील रेल्वे‌ स्टेशनच्या बंगल्यामध्ये देखभालीसाठी यायचा. तेथीलच एखाद्या रिकाम्या क्वॉर्टरमध्ये मुक्काम ठोकायचा. मात्र मागील वर्षभरापासून नागपूर-नागभीड रेल्वे बंद झाल्यामुळे रेल्वे स्टेशन व क्वॉर्टर परिसरातील रेलचेल थांबली आहे. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पीडित १० व ११ वर्षीय दोन्ही अल्पवयीन मुली रेल्वे क्वॉर्टर परिसरातील घराच्या अंगणात खेळत होत्या. दरम्यान, आरोपीने त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवत क्वॉर्टरमध्ये बोलाविले. त्यानंतर तिथे त्याने अत्याचाराचा प्रयत्न केला. अश्लील स्पर्शामुळे पीडित मुली घाबरल्या. त्यांनी आरडाओरड करत आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. पीडित मुलींनी पालकांना सांगताच त्यांनी पोलिसांना कळविले. लागलीच आरोपीला रेल्वे क्वॉर्टरमधून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध बलात्काराचा प्रयत्न व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत असल्याची माहिती ठाणेदार महेश भोरटेकर यांनी दिली.

Web Title: Attempt to torture two minor girls by railway ‘Track Man’