शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पार्सलमधून गॅस सिलिंडर पाठवण्याचा प्रयत्न

By नरेश डोंगरे | Updated: April 21, 2024 22:14 IST

पुण्याला जाणार होते पार्सल : आरपीएफकडून एकाला अटक

नागपूर : रेल्वे गाड्यांमधून घातक साहित्य आणि ज्वलनशिल पदार्थ तसेच चिजवस्तू नेण्यास सक्त मनाई असताना देखिल रेल्वेच्या पार्सल बोगीमधून चक्क गॅस सिलिंडर नेण्याचा एका आरोपीने प्रयत्न केला. हा गैरप्रकार उघड होताच रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) शनिवारी रात्री एका तरुणाला अटक केली.

येथील रेल्वे स्थानकावरील पार्सल विभागातून काही जणांना हाताशी धरून दलाल कोट्यवधींची रोकड, माैल्यवान चिजवस्तू, प्रतिबंधित साहित्य, चिजवस्तू आणि ज्वलनशिल पदार्थ ठिकठिकाणी पाठवित असल्याचा खुलासा लोकमतने दोन आठवड्यांपूर्वी केला होता. त्याची दखल घेत रेल्वेचे विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी पार्सल विभागात अत्याधुनिक स्कॅनिंग सेटअप लावला. स्कॅनर मशिनमधून स्कॅन केल्याशिवाय कोणतेही सिलबंद पार्सल रेल्वे गाडीत अपलोड करायचे नाही, असा आदेशही मित्तल यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अनेक दलालांनी विरोध करून काही व्यापाऱ्यांना स्कॅनर मशिनच्या विरोधात उकसावणे सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर, शनिवारी एका पार्सलची तपासणी सुरू असताना त्यात गॅस सिलिंडर आणि एक छोटी शिगडी लपवून असल्याचे दिसून आले. आरपीएफचे एएसआय बी. के. सरपाते आणि डी. एस. सिसोदिया यांनी लगेच त्याची दखल घेत चाैकशी सुरू केली. हे पार्सल सचिन पिंपळे ब्रदर्स पॅकिंग मुव्हर्स कार्गोच्या बिलावर १० नग घरगुती सामानाची नोंद करून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. नागपूरहून हे प्रतिबंधित सामान पुण्याला जाणार असल्याचेही पुढे आले. त्यामुळे रोहित गणेश बहोरिया (वय ३४, रा. न्यू इंदोरा) याला ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने आमिषापोटी खोटी माहिती देऊन हे ज्वलनशिल तसेच प्रतिबंधित साहित्य रेल्वेत लोड करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. आरपीएफने रेल्वे कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. आठवडाभरात दुसरा गैरप्रकारमनाई असताना पार्सलमधून मोठी रोकड अन् प्रतिबंधित चिजवस्तू बाहेर पाठविल्या जात असल्याचे वृत्त 'लोकमत'ने यापूर्वी प्रकाशित केले. त्यानंतरही स्कॅनरला बायपास करून ६० लाख रुपये दलालांनी दुरंतो एक्सप्रेसमधून पार्सलने मुंबईला पाठविले होते. ते मुंबईत पकडल्यानंतर पार्सल विभागात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चाैकशी सुरू असतानाच आता पार्सल विभागातून एका आठवड्यात दुसऱ्यांदा हा गैरप्रकार उघड झाला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर