शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात निवृत्त न्यायाधीशांकडे चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 21:06 IST

येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश विजय मुरकुटे यांच्या दाराजवळची ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ऐनवेळी घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीची घटना टळली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली.

ठळक मुद्देदाराजवळची ग्रील तोडली : घरातील लाईट लागल्याने चोरटे पळाले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश विजय मुरकुटे यांच्या दाराजवळची ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ऐनवेळी घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीची घटना टळली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली.जिल्हा न्यायाधीश पदावरून मुरकुटे चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले. सध्या ते लोक न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून सेवा देत आहेत. प्रतापनगरातील दुर्गा माता मंदिरासमोर असलेल्या गिट्टीखदान लेआऊटमध्ये त्यांचे दुमजली निवासस्थान आहे. खालच्या माळ्यावर ते आणि त्यांची पत्नी जयमाला मुरकुटे राहतात. नेहमीप्रमाणे रविवारी मुरकुटे दाम्पत्य जेवण केल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास झोपी गेले. त्यांनी आपल्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या ग्रीलसमोर कार लावली होती. कारचा आडोसा घेत रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी घरात शिरण्यासाठी मोठ्या रॉडने ग्रीलचे लोखंडी बार उचकावून ग्रील तोडण्याचा प्रयत्न केला. नेमक्या वेळी जयमाला मुरकटे यांना जाग आली. त्यांनी घरातील लाईट लावल्याचे बघून चोरट्यांनी तेथून पळ काढला. या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले मुरकुटे दाम्पत्य नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी जागे झाले. ते घराबाहेर आले तेव्हा चोरट्यांनी ग्रील तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. निवृत्त न्यायमूर्तींकडे चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळताच बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहचले. त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. वृत्त लिहिस्तोवर चोरट्यांचा शोध लागला नव्हता.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर