शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 00:53 IST

शहरातील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार घेऊन एक महिला जरीपटका ठाण्यात गुरुवारी सायंकाळी धडकली. तिने घेतलेली नावे पाहून पोलिसांचीही काही वेळेसाठी भंबेरी उडाली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.

ठळक मुद्देमहिलेने घेतली प्रतिष्ठितांची नावे : पोलिसांनी चालविली चौकशी : जरीपटका ठाण्यात धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तीन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी कारमध्ये बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार घेऊन एक महिला जरीपटका ठाण्यात गुरुवारी सायंकाळी धडकली. तिने घेतलेली नावे पाहून पोलिसांचीही काही वेळेसाठी भंबेरी उडाली. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.पीडित महिला सदरमध्ये राहते तर, तिचा व्यापारी मित्र कडबी चौकात राहतो. त्याचे धंतोलीत कॉम्प्युटर, लॅपटॉपचे शोरूम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारी आणि महिलेची मैत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून या मैत्रीत दुसऱ्या काही महिला शिरल्याने महिला व्यथित झाली असून, त्यावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री सदर महिला व्यापाऱ्याच्या घरी धडकली. त्यांच्यात यावेळी कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर व्यापारी महिलेला त्याच्या कारमध्ये घेऊन गेला. चर्चा करण्याच्या बहाण्याने त्याने आपल्या दोन मित्रांना तेथे बोलावून घेतले. या तिघांनी कारमध्येच बलात्कार केल्याचा प्रयत्न केला. मात्र, कशीबशी सुटका करून घेत आपण तेथून घरी पोहचल्याचे आणि आता थोडी सावरल्यामुळे तक्रार द्यायला आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तिने घेतलेली नावे ‘वजनदार’असल्यामुळे पोलिसांनी तिची तक्रार चौकशीत ठेवली. यासंबंधाने रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे जरीपटका पोलिसांनी टाळले. एवढेच नव्हे तर वारंवार फोन करूनही जरीपटका पोलिसांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग