लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारमधील दोन वेटरमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाने दुसऱ्याचा गळा आणि गुप्तांग कापून जीव घेण्याच्या प्रयत्नात झाले. यात राधेश्याम सराटे (वय ४०) हा वेटर गंभीर जखमी झाला. सीताबर्डीतील कोलकाता बीअर बारमध्ये घडलेला हा थरार सोमवारी रात्री उघडकीस आला.सराटे आणि आरोपी घनश्याम मडावी (वय ३०) हे दोघेही मध्य प्रदेशातील मंडला येथील रहिवासी आहेत. सीताबर्डीतील कोलकाता बारमध्ये ते वेटर म्हणून काम करतात. तेथेच एका खोलीत ते राहतात. रविवारी रात्री बार बंद झाल्यानंतर बार मालक आणि अन्य कर्मचारी निघून गेले. तर, आरोपी मडावी आणि सराटे त्यांच्या खोलीत नेहमीप्रमाणे झोपले. त्यांच्यात कधी वाद झाला कळायला मार्ग नाही. सराटेच्या गळ्यावर आणि गुप्तांगावर धारदार शस्त्राचा घाव घालून आरोपी मडावी पळून गेला. सोमवारी बार बंद असल्यामुळे दिवसभर या घटनेबाबत कुणाला काही माहीतच पडले नाही. बारमालक रात्री बार उघडण्यासाठी आला तेव्हा त्याला सराटे रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. त्याने लगेच सीताबर्डी ठाण्यात माहिती दिली. ठाणेदार हेमंतकुमार खराबे आपल्या सहकाºयांसह पोहचले. त्यांनी जखमीला मेडिकलमध्ये पाठविले. डी.एस. राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनिरीक्षक छाया येलकेवार यांनी गुन्हा दाखल केला.मध्य प्रदेशात सापडला आरोपीआरोपी मडावी मंडला येथील रहिवासी असल्यामुळे त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रात्रीच मध्य प्रदेशकडे निघाले. त्यांनी मंगळवारी सकाळी मडावीला ताब्यात घेतले. तेथून त्याला घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले. वृत्त लिहिस्तोवर पोलीस पथक नागपुरात पोहचायचे होते.
नागपुरात गळा आणि गुप्तांग कापून हत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 20:21 IST
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारमधील दोन वेटरमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान एकाने दुसऱ्याचा गळा आणि गुप्तांग कापून जीव घेण्याच्या प्रयत्नात झाले. यात राधेश्याम सराटे (वय ४०) हा वेटर गंभीर जखमी झाला. सीताबर्डीतील कोलकाता बीअर बारमध्ये घडलेला हा थरार सोमवारी रात्री उघडकीस आला.सराटे आणि आरोपी घनश्याम मडावी (वय ३०) हे दोघेही मध्य ...
नागपुरात गळा आणि गुप्तांग कापून हत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देदोन वेटरमधील वाद : सीताबर्डीतील बारमध्ये थरार