लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चारित्र्याच्या संशयावरून वाद घालून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला एका नवरोबाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास खापरी पुनर्वसन सेक्टर नंबर २६ मध्ये ही थरारक घटना घडली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नवरोबा सुनील प्रभाकर गोडमारे (वय ४०) याला अटक केली आहे.मीनाक्षी सुनील गोडमारे (वय ३५) हिचा पती सुनील गोडमारे संशयखोर आहे. लग्न झाल्यापासूनच तो तिच्या चारित्र्यावर संशय घेतो. वारंवार भांडण करून तिला मारहाण करतो. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास तो घरी आला. मीनाक्षीने त्याला सकाळचे जेवण वाढले. शिळे अन्न खायला दिले म्हणून त्याने तिच्याशी वाद घातला. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला शिवीगाळ करू लागला. पत्नीने त्याला हरकत घेतल्यामुळे या दोघांमधील वाद वाढला. त्यावरून आरोपीने घरातील रॉकेलची डबकी पत्नीच्या अंगावर ओतली आणि माचिसची काडी उगाळून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत आरडाओरड करीत मीनाक्षी घराबाहेर पळाली. शेजारी मदतीला धावल्याने तिचा जीव वाचला. तिने बेलतरोडी पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी सुनीलविरुद्ध पत्नीचा छळ करून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. सुनीलला अटक करण्यात आली आहे.
नागपुरात पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न : आरोपी नवरोबा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:55 IST
चारित्र्याच्या संशयावरून वाद घालून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला एका नवरोबाने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास खापरी पुनर्वसन सेक्टर नंबर २६ मध्ये ही थरारक घटना घडली.
नागपुरात पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न : आरोपी नवरोबा गजाआड
ठळक मुद्देचारित्र्याच्या संशयावरून वाद : अंगावर रॉकेल ओतले