नागपुरात भाजप युवा मोर्चातर्फे सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 09:43 PM2021-08-28T21:43:54+5:302021-08-28T21:44:39+5:30

Nagpur News विद्यार्थिनीची परदेशी शिष्यवृत्तीसाठी नियमबाह्य निवड केल्याचा आरोप करीत भाजप युवा मोर्चातर्फे शनिवारी हिवरीनगर येथे खा. सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला.

Attempt to block Supriya Sule's convoy by BJP Youth Front in Nagpur | नागपुरात भाजप युवा मोर्चातर्फे सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

नागपुरात भाजप युवा मोर्चातर्फे सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देराष्ट्रवादीकडून महापालिका लढवलेल्या विद्यार्थिनीची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेची निवडणूक लढवलेल्या सायली रवींद्र शेंडगे या विद्यार्थिनीची परदेशी शिष्यवृत्तीसाठी नियमबाह्य निवड केल्याचा आरोप करीत भाजप युवा मोर्चातर्फे शनिवारी हिवरीनगर येथे खा. सुप्रिया सुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या घराजवळच हा प्रकार घडला. (Attempt to block Supriya Sule's convoy by BJP Youth Front in Nagpur)

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्तीअंतर्गत 'पदव्युत्तर सार्वजनिक आरोग्य' अभ्यासक्रमाला २०१५-१६ पासून मान्यता नाही. तरीही त्या विषयासाठी सायलीची निवड झाली. सामाजिक न्याय खाते हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने राजकीय दबावाने सायलीची निवड झाल्याचा आरोप अन्य विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. विशेष म्हणजे खा. सुप्रिया सुळे यांनी सायलीला शिष्यवृत्ती निवडीबद्दल शुभेच्छा देत यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याची माहिती ट्विटरवरून दिली.

त्यामुळे सायलीची निवड ही राजकीय वशिल्यातून झाली आहे, असा आरोप भाजयुमोने केला आहे. आंदोलनात शहर भाजपाचे महामंत्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले, भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मनिष मेश्राम, संकेत कुकडे, सन्नी राऊत, बादल राऊत, पंकज सोनकर, प्रसाद मुजुमदार आदींचा समावेश होता.

Web Title: Attempt to block Supriya Sule's convoy by BJP Youth Front in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.